पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का? दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते. मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन रसायन दह्यामध्ये असते. हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही.
आपण खाल्लेल्या गोष्टी पासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते. शरीरातील इतर घटका सोबत त्याचे मिश्रण झाल्यावर सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही रसायने तयार होतात. त्यातील सेरटोनिन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय उत्तम आहे. त्याने आपला मूड चांगला होणे, झोप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणे यांसारखे फायदे होतात. ट्रिप्टोफॅनने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याला मेंदूत जाणाऱ्या रक्तापर्यंत जावे लागते. ते इतर रसायना एवढे सोपे नाही. त्यासाठी ट्रिप्टोफॅनचे कर्बोदका बरोबर विघटन व्हावे लागते. कर्बोदकांच्या मदतीने ट्रिप्टोफॅन मेंदूच्या रक्तापर्यंत पोहोचते.
दही भाता बरोबर का खावे याचे प्रमुख कारणे म्हणजे तांदळा मध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. म्हणून दहीभात खाल्ल्याने मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते. असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. त्यामुळे जेवणाची सांगता करताना थोडा तरी दहीभात खावा. दहीभात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतो, शिवाय आनंदी राहण्यास मदत होते. भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा सर्वसामान्य गैरसमज आहे. मात्र दही भात खाणे हितकारक ठरते. त्यामुळे वजन वाढत नाही तर कमी होतं. आजकालच्या जीवनशैलीचा परिणाम नक्कीच आरोग्यावर होतो. दहीभात खाण्याचे फायदे जाणून घेऊया
वजन कमी होते: दही भात नियमित खाल्याने वजन कमी होते, कॅरलीज घटतात.
तापावर फायदेशीर: ताप आल्यावर दहीभात खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र दहीभात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसंच दह्यामुळे इम्मुनिटी वाढते.
पोट बिघडल्यावर: पोट बिघडल्यावर इतर पदार्थ खाण्यावर बंधने येतात. पण दहीभाताने पोट शांत होते, अन्न व्यवस्थित पचते आणि जुलाबावर आराम मिळतो.
बद्धकोष्ठतेवर: जर बद्धकोष्ठतेचा त्रासअसेल तर काही दिवस दहीभाताचे सेवन करावे. त्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरीया असतात. यामुळे पचन व्यवस्थित होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
तणावमुक्ती: दहीभात खाल्याने तणाव कमी होतो. त्यात असलेल्या प्रोबायोटिक बॅक्टेरीया, अॅटी ऑक्सीडेंट आणि गुड फॅट्स यामुळे मुड सुधारण्यास मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)