संधिवात म्हणजे काय प्रकार कोणते 

आरोग्य

संधी म्हणजे सांधे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे एकत्र येऊन सांधा तयार होतो. ह्या सांध्यांच्या ठिकाणी होणारी वेदना म्हणजे संधिवात. काही लोक संधिकाळात दुपार संपून रात्र होण्याचा काळ सांध्यांच्या ठिकाणी होणारी वेदना म्हणजे संधिवात असाही अर्थ घेतात. संधिवात या रोगात मात्र माणसे असाह्य होतात, विकलांग होतात. खर्च जो भोगतो तोच जाणतो. किती भयंकर वेदना देतो हा संधिवात या संधिवाताचे प्रामुख्याने आढळून येणारे प्रकार

१) आमवात: या प्रकारात मोठे सांधे (गुढगे,कोपर) सुजतात,दुखतात, भूक कमी होते, ताप येतो, हालचाली करणे कठीण होते. काही रुग्णांत हातापायाची बोटे देखील सुजतात. एका सांध्याची सूज कमी झाली कि दुसरा सुजते हे एक विशेष लक्षण पाहायला मिळते. ढगाळ वातावरणात तर अक्षरशः हातपाय हलवणं देखील अवघड होऊन जात.

दक्षता 

१) मिठाई, बेकारीचे पदार्थ, फास्ट फूड, थंड पदार्थ, हवाबंद पदार्थ (जाम,जेली,) आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स इ. पूर्ण बंद करावीत.

२) व्यसने पूर्ण बंद करावीत. थंडीच्या दिवसात उबदार कपडे घालावेत.

3)रात्री थोडे कमी जेवण घ्यावे.

४) जास्त वेळ पाण्यात काम करू नये. फॅन व ऐसी चा वापर कमी करावा.

५) मनावरील ताण-तणाव कमी करण्यासाठी शवासन, प्राणायाम, ओंकार जप करावा.

६) स्वतःच्या मर्जीने केमिस्ट कडून आणून औषधे, गोळ्या, स्टिरॉइड्स, वेदनाशामक गोळ्या घेऊ नये. स्टिरॉइड्स मुळे किडनी व हाडे यांचेवर वाईट परिणाम होतो.

७) दारावर, रस्त्यावर फिरणारे जडीबुट्टी घेऊन येणाऱ्या अनोळखी व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची औषधे किंवा इंजेक्शन्स घेऊ नयेत.

२) वातरक्त: या प्रकारच्या संधिवातात हातापायांच्या बोटांचे सांधे सुजतात व दुखतात. विशेषतः हात किंवा पायाच्या अंगठ्याचा ठिकाणी सूज येते व त्यामुळे कौशल्यपूर्वक हालचालींना अडथळा येतो. उदा. शर्टाची बटणे लावणे, लिहिणे, तांदुळातील खडे निवडणे, सुईत धागा ओवणे, इ. आधुनिक शात्रानुसार आपण आहारात घेत असलेल्या प्रोटिन्सचे पचन बिघडल्यामुळे तयार होणार युरिक ऍसिड हात व पायांच्या बोटाच्या ठिकाणी विशेषतः अंगठ्याच्या मुळाशी साठून सूज येऊन ठणका सुरु होतो. यालाच इंग्रजीत गाऊट असे म्हणतात.

दक्षता

१) हा आहाराशी संबंधित संधिवात असल्याने मांसाहार, मद्यपान व इतर व्यसनेपुर्ण बंद करावी लागतात. कडधान्ये व डाळींचे प्रमाणहि खूप कमी करावे लागते.

२) युरिक ऍसिड ची तपासणी वारंवार करावी.

३)मनावरील ताणतणाव कमी करण्यासाठी आसने, प्राणायाम, शवासन ₹, ओंकार जप,ध् यान इ. क्रिया कराव्यात.

४) मिठाई, बेकारीचे, तळलेले, थंड, डालडा तुपाचे ₹, मैद्याचे पदार्थ टाळावेत.

५) ढगाळ वातावरण,थंडीत उबदार कपडे वापरावेत.

३) वयोमानानुसार होणार संधिवात: खरेतर हा रोग नव्हे. वयोमानानुसार सांध्यातील हाडांच्या चकती झीज झाल्याने शरीरात हा बदल होतो. विशेषकरून उभं राहिल्यावर आपलं वजन पेलणाऱ्या सांध्यांमध्ये हा होतो. गुढगे व घोटे या ठिकाणी हा जास्त करून दिसून येतो. उभे राहून काम करणारे ठेकेदार, शिक्षक, बस वाहक, वाहतूक नियंत्रक पोलीस, खडतर रस्त्यांवर वाहनातून प्रवास करणारे प्रवासी विशेष करून दुचाकी व तीनचाकी प्रवासी, नाव्ही, शेतमजूर इ.या लोकांमध्ये या संधिवाताचा धोका जास्त संभवतो. मानेच्या माणक्यामधील चकती झिजून होणार संधिवात हल्ली खूप प्रमाणात दिसून येतो. स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात त्यांना कणिक मळताना, तळताना,कपडे पिळताना,भांडी घासताना, एकसारखा दाब खांद्यातून देतात. शिवाय जास्तीचा दुचाकींचा प्रवास ह्या प्रकाराला तुम्हाला आमंत्रित करतो. या प्रकारात हात दुखणे, मुंग्या येणे, सकाळी उठल्यावर हाताच्या बोटांच्या ठिकाणी जडपणा जाणवणं इ. लक्षणे दिसून येतात. गुढगे व घोटांच्या सांध्यांमधली चकती झिजली कि सांधे दुखू लागतात व कटकट असा आवाज येऊ लागतो. प्रामुख्याने खाली बसून उठताना किंवा शौचाला बसताना गुढग्यात खूप वेदना होतात. अति लठ्ठ लोकांना वय झाल्यावर बहुतेक चाळीशी नंतर हा संधिवात होतो.

४) जंतुसंसर्गामुळे होणार संधिवात: अशाप्रकारचा संधिवात काही जिवाणूंच्या संसर्गामुळे होतो. तेव्हा सांध्याच्या ठिकाणी पु होऊ शकतो /लागतो. टी .बी. सारख्या रोगांच्या जंतुसंसर्गाने देखील संधिवात होऊ शकतो. हा संधिवात सांधा जोरदार सुजणे ,ताप,भुक मंदावणे इ. लक्षणे दिसून येतात.

५) प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे होणार संधिवात

हा अनुवंशकतेने येणार संधिवात आहे.

दक्षता 

ताजे सकस व पौष्टिक अन्न खावे. फळे, पालेभाज्या खाव्यात. जिभेचे चोचले पुरवणारे अन्न टाळावे. रोज न चुकता किमान एक तास तरी व्यायाम करावा. जेवणात लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादी फळे तुमची प्रतिकारशक्ती वाढवतील.

६) हाडे ठिसूळ होऊन होणार संधिवात: हाडातील कॅल्शिअम व फॉस्फोरस कमी झाल्याने हाडे ठिसूळ होतात व दुखू लागतात. हा वयोमान नुसार होणार संधिवात आहे. स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यानंतर हा संधिवात आढळतो.

दक्षता

जिना चढ उत्तर करू नये. मद्यपान, तंबाखूजन्य व्यसन, चहा,कॉपी बंद करावे. फास्ट फूड, प्रिझर्वेटीव्हज पदार्थ टाळावेत. नियमित योगासने व प्राणायाम करावेत.

७) चिकन गुनिया: ह्या प्रकारच्या संधिवाताने हल्ली थैमान घातले आहे. यामध्ये शरीरातील सर्व सांधे दुखतात. सुरवातीच्या काळात जोरदार ताप येतो. औषधाने ताप जातो परंतु सांधे दुखायचे मात्र थांबत नाहीत. काही जणांचे सांधे तर वर्षभर दुखतात. रक्ताच्या तपासणीत IgG IgM for Ch gunia ह्या अँटीबॉडीज सापडतात.

संधिवात टाळण्यासाठी 

आहार नियम (काय टाळावे)

१)फळे व दूध एकत्र करून खाऊ नये

२)थंड व गरम पदार्थ एकत्र करून खाऊ नये.

३) दूध व दही एकत्र करून खाऊ नये.

४) रात्री दही खाऊ नये.

५) अति गोड पदार्थ अति प्रमाणात खाऊ नये.

६) बेकारी, मैद्याचे पदार्थ, अतिप्रमाणात खाऊ नयेत.

७)अति थंड पदार्थ वारंवार खाणे टाळावे, थंडीच्या दिवसात व ढगाळ वातावरण असेल तर खाऊच नये जेवणासोबत /जेवणापूर्वी/जेवणानंतर लगेचच तांडा पदार्थ खाणे पिणे टाळावे.

८) हवाबंद पदार्थ उदा. लोणची, जाम सरबत.. वेफर्स.. इत्यादी अतिप्रमाणात खाणे टाळावे.

9) वातूळ पदार्थ उदा. वाटाणा, पावटा, वांगे, राजमा वारंवार जेवणात असू नयेत.

१०) उपवासाचे जड पदार्थ उदा. साबुदाणा, शेंगदाणा,वरईचा तांदूळ इत्यादी गोष्टी अतिप्रमाणात खाऊ नयेत.

११)अन्न वारंवार शिजवून (परत परत गरम ) करून खाऊ नये.

१२) भरभर जेवण उरकू नये.

१३)जेवताना वारंवार पाणी पिऊ नये.

१४)टीव्ही, मोबाईल किंवा वर्तमानपत्र पाहत जेवण करू नये.

विहार नियम(काय टाळावे) 

१)दुपारी झोपणे टाळावे.

२)अति कष्ट/व्यायाम करू नये.

३) अति मैथुन करू नये.

४)अति थंड पाण्यात पोहणे किंवा कडाक्याच्या थंडीत उद्याने फिरणे टाळावे.

५)सेल्फ मेडिकेशन करणे टाळावे.

आहार नियम (काय कराव)

१)ताजा, हितकर, सात्विक,सकस आहार घ्यावा.

२)जेवताना प्रत्येक घास चावून चावून खावा.

३)नेहमीच भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत.

४)गोड, आंबट,खारट, तिखट, तुरट व कडू या रसांनी युक्त असलेला आहार घ्यावा.

विहार नियम(काय कराव)

१)रोज थोडा वेळ व्यायाम करावा. उदा. सायकलिंग, स्विमिंग, ब्रिस्क वॉकिंग, सूर्यनमस्कार.

२) मनावरील ताण कमी करण्यासाठी ओंकार जप, ध्यान धारणा व प्राणायामाचा अब्यास करावा.

3)जिभेवर नियंत्रण ठेवून वजन आटोक्यात आणावे.

उपयुक्त आसने.

१) ताडासन २)त्रिकोणासन ३)अर्धकटिचक्रासन ४)गोमुखासन ५)शवासन ६)अर्धमत्स्येद्रासन ७)अर्धआकर्णनुरासन ८) प्राणायाम – ओंकार जप, दीर्घ श्वासोच्छवास, कपालभाती.

संधिवात हा आजार नेमका आपल्या हालचालींवर म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर हल्ला करतो. सांधे सुजतात, ठणकतात, जखडतात व विद्वान माणूस देखील या रोगासमोर अक्षरशः गुढगे टेकतो, व सुरु होतो जीवनातील एक असाह्य ,निराधार, निर्जीव प्रवास

(सोशल मीडियावरून साभार)