कंबरदुखीवर काय कराल उपाय

आरोग्य

१) चालताना किंवा बसताना आपली पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे कंबरदुखीचा त्रास होणार नाही.

२) शक्यतो एका जागी जास्त वेळ बसू नका, जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर अधून मधून चालण्याचा प्रयत्न करा.

३) कॅल्शिअम युक्त आहार घ्या. तुमची कंबरदुखी दूर करण्यात कॅल्शियम महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. त्यामुळे शक्य तितका कॅल्शियम युक्त आहार घ्यावा. ते शक्य नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लीमेंट्स घेतली तरी चालेल.

४) नारळाच्या तेलात लसणाच्या काही पाकळ्या टाकून ते तेल गरम करुन घ्या आणि जिथे दुखत आहे त्या कंबरेच्या भागाला लावा.