तुम्ही जे खाता त्यातून तुम्हाला कॅन्सर किंवा डायबिटिस तर होणार नाही

आरोग्य

प्लास्टीकपासून बनलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये धोकादायक रसायनं असतात. अभ्यासानुसार ७६ संदिग्ध पदार्थ स्तन कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणारे घटक दिसून आले. ज्यातील ६१ तत्व प्लास्टीकशी संबंधित होते. ज्यामुळे स्तनांच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

९० टक्के लोकांना बीपीएचा धोका: पॅकेज्ड फूडमध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते. जे हाय ब्लड प्रेशरचं मुख्य कारण मानलं जातं. ज्यामुळे हृदयाचे आजार उद्भवतात. कॅन किंवा बॉटल्समधल्या अन्नात फॅट्स जास्त प्रमाणात असते. जे सॅच्युरेडट फॅट असते जे खूपच घाणेरडे मानले जाते. यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल वाढते. जे नसांमध्ये जमा झाल्यामुळे हृदयाचे विकार वाढतात.

डायबिटीस: पॅकेज्ड फूड्स आणि ड्रिंक्समध्ये आर्टिफिशियल स्वीटनरर्स असतात. ज्यात साखर, मीठ वेगानं विरघळतं आणि ब्लड शुगर वाढते. दीर्घकाळ या पदार्थांचे सेवन केल्यानं डायबिटीसचा धोका वाढू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)