मुंबई: काल 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणाच्या पानीपतमध्ये विमा सखी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश महिला सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी ट्रेनिंग दिलं जाईल, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल.
योजना काय आहे
महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी 3 वर्षांचा स्पेशल ट्रेनिंग दिला जाईल.
प्रथम वर्षी 7000 रुपये (महिन्याला)
दुसऱ्या वर्षी 6000 रुपये
तिसऱ्या वर्षी 5000 रुपये मिळतील.
याशिवाय कमिशन देखील दिलं जाईल.
विमा सख्यांना डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधी मिळेल.
कोणाला करता येणार अर्ज?
अर्ज करण्यासाठी किमान 10 वी पास असणे आवश्यक.
18 ते 70 वर्षे वयोगटातील महिलांना अर्ज करण्याची संधी आहे.
योजनेचा फायदा
1) प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळतील.
2) स्पेशल ट्रेनिंग मिळेल आणि विमा क्षेत्रात चांगली करियर संधी मिळेल.
3) आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता साधता येईल.
4) विमा क्षेत्रातील अनुभवामुळे उद्योगातील मोठ्या संधी मिळवता येतील.
आवश्यक अटी
किमान शैक्षणिक अटी: 10 वी पास.
वयाची अट: 18 ते 70 वर्षे.
महिलांसाठीच योजना
महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता मिळवून देणारी विमा सखी योजना आपल्याला सक्षम बनवेल. अर्ज करा आणि आपला करिअर सुरू करा.