आमदार प्रशांत बंब यांच्यासह संपूर्ण पॅनलला सभासदांचा ‘दे धक्का’…

महाराष्ट्र

औरंगाबाद: गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत बंब यांना सभासदांनी नाकारत सत्तांतराचा कौल दिला असून शिवसेना ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या गटाने निवडणूक झालेल्या सर्व २० जागांवर दणदणीत विजय मिळविला. आमदार प्रशांत बंब यांचादेखील पराभव झाला आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये कारखाना अध्यक्ष आ. बंब यांच्यासह विद्यमान संचालक मंडळावर भ्रष्टाचाराच्या आरोपातून गुन्हे दाखल झाल्याने मध्यंतरी कारखाना राज्यभर गाजला होता. यामुळे या कारखाना निवडणुकीकडे तालुक्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यात कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या पॅनलने सर्व जागांवर ९०० पेक्षा अधिक मताच्या फरकाने विजय मिळवला. कारखान्याचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब गावंडे व पॅनल प्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अनुक्रमे ४ हजार २१० व ४ हजार २०५ अशी सर्वाधिक मत मिळवली. पराभूत पॅनलचे प्रमुख आमदार प्रशांत बंब यांचा ऊस उत्पादक मतदारसंघ लासूर गटातून ९५५ मतांनी पराभव झाला.

विजयी संचालक पुढीलप्रमाणे

कृष्णा पाटील, सुरेश मनाळ, प्रवीण वालतुरे, कचरू शिंदे, तुकाराम कुंजर, शेषराव पाटेकर, दिलीप बनकर, माया दारुंटे, शोभाबाई भोसले, काशीनाथ गजहंस, बाबूलाल शेख, मधुकर साळुंखे, शेषराव साळुंखे, कारभारी गायके, दादासाहेब जगताप, अप्पासाहेब गावंडे, मनोहर दुबिले, प्रल्हाद निरपळ, नामदेव दारुंटे, देवचंद राजपूत…