7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

महाराष्ट्र

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा, यासाठी वेतन संहिता (Code on Wages), 2019 अंतर्गत महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. या नियमांनुसार, महिन्याचा पगार पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देणे अपेक्षित असून, नोकरी सोडल्यानंतर Full & Final (F&F) सेटलमेंट दोन कामकाजाच्या दिवसांत पूर्ण करण्याची तरतूद आहे.

पगारासंदर्भातील नियमांनुसार, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना शिफ्ट संपल्यानंतर त्याच दिवशी मजुरी देणे आवश्यक आहे. साप्ताहिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टीपूर्वी वेतन मिळावे, तर पंधरवड्याने वेतन घेणाऱ्यांना पंधरवडा संपल्यानंतर दोन दिवसांच्या आत पगार देणे अपेक्षित आहे.

Full & Final सेटलमेंटमध्ये थकीत वेतन, रजा रोखीकरण (Leave Encashment), बोनस आणि इतर देय रकमेचा समावेश असू शकतो. या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांना देय रक्कम मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू नये, हा उद्देश आहे.या तरतुदींचा लाभ खासगी क्षेत्रातील कर्मचारी, रोजंदारी कामगार, साप्ताहिक व पंधरवड्याने वेतन घेणारे कर्मचारी तसेच राजीनामा देणारे किंवा सेवामुक्त होणारे कर्मचारी यांना होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत