अमित शाह-शिंदे भेटीत विकासावर भर; शिवसेनेच्या ६ खासदारांच्या मतदारसंघांना केंद्राकडून गतीचे आश्वासन

महाराष्ट्र

नवी दिल्ली : ‘उबाठा’ गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. या बैठकीला शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही उपस्थित होते.

या बैठकीत सहाही खासदारांच्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामे, केंद्र सरकारच्या विविध प्रकल्पांना मंजुरी, आवश्यक निधी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. मतदारसंघातील विकासकामे वेगाने पूर्ण करण्यासाठी केंद्राचे सहकार्य मिळावे, अशी मागणी खासदारांनी अमित शाह यांच्याकडे केली.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व खासदारांचे स्वागत करत त्यांच्या मतदारसंघातील लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी व इतर सहकार्याची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.या भेटीमुळे शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांतील विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत