मेल नर्सेस बचाव समितीला मुख्यमंत्री यांनी दिले आश्वासन

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर: मेल नर्स बचाव समिती महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस झाला. या पार्श्वभूमीवर उपोषणकर्त्यांच्या श्री.आदी बनसोडे सम्यक जमदाडे आदिनाथ पवार समीर शेख प्रसाद घुले शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विमानतळावर भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी “नर्सिंगमधील 80:20 लिंगभेदाचा मुद्दा मला माहिती आहे, हा विषय तातडीने पाहतो आणि लवकरच निर्णय घेतो” असे आश्वासन दिले.

तथापि, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मेल नर्सेस बचाव समितीचे आंदोलने सुरुच राहतील असा निर्णय समितीने घेतला आहे.

दरम्यान, विधानभवनातही या मुद्द्याला गती मिळाली. अपक्ष आमदार सत्यजित दादा तांबे यांनी अधिवेशनात आवाज उठवत लिंगभेद रद्द करण्याची मागणी केली. थेट वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार निलेश लंके, खासदार ओमराजे निंबाळकर, भाजप आमदार डॉ. तुषार राठोड, राज्यमंत्री दर्जा रविकांत दादा तुपकर तसेच विविध सत्ताधारी पक्ष अपक्ष सामाजिक संघटना, चळवळीचा पाठिंबा मिळाला.

या मागणीनंतर मंत्रालय गेटसमोर निदर्शने झाली. सचिवांसोबतच्या बैठकीत समितीने थेट प्रश्न उपस्थित केला – “वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे? 80:20 लिंगभेद धोरण कोणी मागितले? कोणी यासाठी रस्त्यावर उतरले? यावरून स्पष्ट झाले की हे धोरण पूर्णपणे Gender Discrimination असून संविधानातील कलम 14, 15, 16 चा भंग आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांत विविध पद्धतीने निदर्शने, निवेदन सादरीकरण, मोर्चे सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषण, तर मुंबईतील आझाद मैदानावरही मोठे आंदोलन झाले आहे.

या लढ्यात समितीचे कार्यकर्ते आदी बनसोडे, डेव्हिड लोखंडे, अजय मराठे, राजाभाऊ राठोड, अविनाश ब्राह्मणे, सम्यक जमदाडे, सतीश सर्वगोडे, अनिल जायभाये, भक्तराम फड, सचिन खंदारे, शंकर नाईकनवरे, रुषिकेश गांगर्डे, गोपाल पवार तसेच जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक पुढाकार घेत असून चळवळ अधिक जोमदार केली आहे. मेल नर्सेस बचाव समितीचा संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, राज्य सरकारकडून ठोस निर्णयाची प्रतीक्षा आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अशी माहिती राज्य समन्वयक आदी बनसोडे यांनी दिली.