school-teacher

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांनो, लागा अभ्यासाला

महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. इयत्ता दहावीचा पहिला पेपर मराठी, हिंदी व इतर प्रथम भाषा या विषयांचा राहील. दरम्यानच्या काळात वेळापत्रकानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी आदी शाखांची परीक्षा होणार आहेत.

परीक्षा १० दिवस अगोदर का?

परीक्षा दहा दिवस अगोदर घेतल्यास विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळेल

परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा १५ ते २० दिवस अगोदर लागू शकतो

पुरवणी परीक्षा वेळेत घेऊन त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशास अडचणी येणार नाहीत

असे बघा वेळापत्रक

इयत्ता दहावी, बारावीचे वेळापत्रक ऑनलाइन जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन वेळापत्रक पाहाण्यासाठी www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

परीक्षेचे असे आहे वेळापत्रक

इयत्ता बारावी

प्रात्यक्षिक परीक्षा : २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी

लेखी परीक्षा : ११ फेब्रुवारी ते १८ मार्च

इयत्ता दहावी

प्रात्यक्षिक परीक्षा : ३ ते २० फेब्रुवारीपर्यंत

लेखी परीक्षा : २१ फेब्रुवारी ते १७ मार्च

या गोष्टी टाळा

विद्यार्थ्यांनी मोबाइलपासून दूर राहावे.

रात्री जागरण करू नये

शिळे अन्न ग्रहण करू नये

तासनतास एकाच ठिकाणी बसू नये

हे आवश्यक अभ्यासाचे वेळापत्रक

नियमित पेपर सोडवून पाहा

पोषक आहार घ्या

अभ्यासासोबत थोडे मनोरंजनही करा