मुंबई: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता महिलांना केवायसीसाठी कार्यालयात किंवा ऑनलाईन अडचणींचा सामना करावा लागणार नाही. कारण अंगणवाडी सेविका स्वतः घरोघरी जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.
केवायसीसाठी शेवटची तारीख
लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी करण्यासाठी फक्त १३ दिवस शिल्लक. केवायसीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. अजूनही लाखो महिलांनी केवायसी केली नसल्याची माहिती मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे. वेळेत केवायसी न केल्यास योजनेचा लाभ बंद होऊ शकतो.
अंगणवाडी सेविका करणार घरोघरी केवायसी
केवायसीची संपूर्ण जबाबदारी आता अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे. सेविका महिलांच्या घरी जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील. सर्व्हर डाऊन, ओटीपी न येणे अशा अडचणी दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे महिलांना पुन्हा पुन्हा फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी ही सोय करण्यात आली आहे.
केवायसी का बंधनकारक आहे
पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी
बोगस लाभार्थी वगळण्यासाठी
योजनेत पारदर्शकता
आणण्यासाठी महिला व बालविकास विभागाने ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
चूक सुधारण्याची एकच संधी
ई-केवायसी करताना काही चूक झाली असल्यास काळजी करू नका. सरकारकडून चूक सुधारण्यासाठी एक संधी देण्यात येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती दुरुस्त करता येणार आहे. याबाबत माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे
महत्वाचे
अंगणवाडी सेविका आल्यावर आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा. आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि आवश्यक माहिती तयार ठेवा. शेवटच्या तारखेची वाट न पाहता केवायसी लवकर पूर्ण करा. लाडक्या बहिणींनो, योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी वेळेत केवायसी नक्की करून घ्या आणि ही माहिती इतर महिलांपर्यंतही पोहोचवा.