संभाजीनगर: राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या खासगी वाहनधारकांसाठी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले की, १५ ऑगस्ट २०२५ पासून फक्त ₹3,000 मध्ये FASTag आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येणार आहे.
वार्षिक पास म्हणजे नेमकं काय
या नव्या योजनेंतर्गत, वाहनचालकांना एकदाच ₹3,000 भरून एक वर्षासाठी किंवा 200 प्रवासांपर्यंत (जे आधी पूर्ण होईल ते लागू) टोल पास मिळणार आहे. हा पास केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इत्यादी) उपलब्ध असेल.
प्रवासी या पासच्या मदतीने देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर FASTag वापरून संपूर्ण वर्षभर अमर्यादित प्रवास करू शकणार आहेत.
या योजनेचे फायदे काय
टोल प्लाझांवर थांबण्याची गरज नाही
वेळ आणि इंधन वाचेल
टोल प्लाझांवरील वाद आणि गर्दी कमी होईल
प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होईल
एकदाच पैसे भरल्यामुळे वारंवार पेमेंटची गरज नाही.
फास्टटॅग वार्षिक पास कुठे आणि कसा मिळवायचा
1) NHAI चा अधिकृत FASTag पोर्टल
2) FASTag जारी करणाऱ्या बँकांची वेबसाइट
3) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध होणार
अर्ज करताना लागणारी माहिती
तुमचा वाहन नोंदणी क्रमांक (RC Number)
नोंदणीकृत मोबाइल नंबर
याव्यतिरिक्त, लवकरच NHAI व MoRTH च्या अधिकृत वेबसाइट्सवर आणि हायवे ट्रॅव्हल अॅप वरूनही पास सक्रिय करण्याची लिंक उपलब्ध होईल.
एकदाच भरा – वर्षभर फिरा
ही योजना वाहनचालकांना फक्त ₹3,000 मध्ये एकदाच पैसे भरून वर्षभर अमर्यादित प्रवास करण्याची संधी देत आहे. कोणतेही टोल थांबे, कोणतेही वाद किंवा त्रास न करता, FASTag वापरून प्रवास अधिक सहज आणि आरामदायक होणार आहे.