महिलांसाठी आनंदाची बातमी! आता एक रुपयाही न भरता ‘ई-पिंक रिक्षा’ मिळणार

महाराष्ट्र

संभाजीनगर: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. राज्य सरकारच्या ई-पिंक रिक्षा योजनेमुळे आता महिलांना कोणताही आर्थिक भार न घेता स्वतःची इलेक्ट्रिक रिक्षा मिळू शकते. यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होईल.

योजना कशी आहे

या योजनेअंतर्गत ई-पिंक रिक्षाची एकूण किंमत सुमारे ₹3,73,000 असून त्यात 70% रक्कम बँकेकडून कर्जरूपात 20% अनुदान राज्य सरकारकडून आणि आता – उरलेली 10% रक्कमही माफ करण्यात आली आहे. म्हणजे महिलांना एकही रुपया न भरता – स्वतःची ई-पिंक रिक्षा मिळणार आहे.

योजनेची उद्दिष्टे

या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे, सुरक्षित रोजगाराची संधी निर्माण करणे, आणि पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त वाहतूक प्रणालीला चालना देणे आहे. महिलांसाठी रिक्षा चालवणे हा सुरक्षित आणि सन्मानजनक व्यवसाय बनावा हीदेखील महत्त्वाची भूमिका या योजनेची आहे.

कोण अर्ज करू शकते

18 ते 45 वयोगटातील महिला

किमान 8वी उत्तीर्ण

स्थानिक रहिवासी असणे आवश्यक

सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक (कर्ज प्रक्रियेसाठी)

मोफत RTO प्रशिक्षण घेण्याची तयारी असावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2025

अर्ज कुठे करावा

संबंधित जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी तिथेच संपर्क साधावा. मुली, बहिणी, माता – आता तुमचं स्वतःचं वाहन चालवा आणि स्वतंत्रपणे कमवा. ही योजना केवळ रोजगार नाही, तर तुमच्या आत्मनिर्भरतेचा प्रवास सुरू करण्याची संधी आहे.