ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; शीतल करदेकर

मुंबई: जेष्ठ पत्रकार निखिल वागळे व सहकाऱ्यांवर पुण्यात हल्ला करण्यात आला. याचा तीव्र निषेध तसेच या हल्लेखोर गुंडावर कठोर कारवाई सरकारने  करायला हवी, अशी  महाराष्ट्राचे गृहमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (माई) संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे. वागळेंच्या कार्यक्रमाची पोलीसांना पूर्व सूचना दिली होती. त्यांनी कार्यक्रमाची पुर्व  परवानगीही मागितली होती, […]

अधिक वाचा..

कलाकेंद्रांवर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती व कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करण्याची गरज

मुंबई: राज्यातील कला केंद्रामध्ये मागील काही दिवसात अल्पवयीन मुली सापडल्या आहेत. त्यामुळे कला केंद्रांना मान्यता देण्यासंदर्भात कठोर नियमावली तयार करण्याची गरज आहे. तसेच कला केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी  जिल्हास्तरीय समित्या गठित करण्यासाठी मसुदा तयार करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. कला केंद्रामध्ये अल्पवयीन मुली सापडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुनर्वसन, उपाययोजना आणि अपहरणातील अल्पवयीन मुली व […]

अधिक वाचा..

मंजुरीपेक्षा जास्त वृक्ष तोडणाऱ्यांवर कुठली कठोर कारवाई करण्यात येणार की नाही

मुंबई: विकासाची कामे करताना संबंधित विभागांकडून परवानगी दिली जाते. पण किती झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे? प्रत्यक्षात किती झाडे तोडण्यात आली आहे.? याची पाहणी कोण करते? परवानगी दिलेल्या पेक्षा जर का जास्त वृक्षे तोडण्यात आल्याचे निदर्शनास येऊन गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्‍न आमदार रविंद्र वायकर यांनी विधेयक क्रमांक ३२ वर […]

अधिक वाचा..

अन्नदात्याला लुबाडणाऱ्या खत-बियाणे कंपन्यांवर काय कारवाई करणार; नाना पटोले 

मुंबई: जगाचा पोशिंदा असलेल्या अन्नदात्याला खत, बियाणे कंपन्या लुबाडत आहेत. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक केली जात आहे. सरकारचा कृषी विभाग राज्यभर आहे पण अशा कंपन्यावर सरकारचा वचक राहिलेला दिसत नाही. शेतकऱ्याला लुबडणाऱ्या, त्याची फसवणूक करणाऱ्या मुजोर कंपन्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे, याची विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत […]

अधिक वाचा..

अंधेरीतील मोगरा नाल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार; मंत्री उदय सामंत

मुंबई: अंधेरी (पश्चिम) ‘के’ प्रभागातील मोगरा नाल्यावर अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. मुंबईतील अंधेरी (पश्चिम) ‘के’ प्रभागातील मोगरा नाल्यावरील अनधिकृत बांधकामाबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री रणजित कांबळे, अशोक चव्हाण, योगेश सागर, अमित साटम, नाना पटोले, सुनील प्रभू, डॉ.भारती […]

अधिक वाचा..

राहुल गांधींवरील अन्यायी कारवाईविरोधात आज काँग्रेसचे ‘मौन सत्याग्रह’ आंदोलन

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने सुडबुद्धीने कारवाई करत खासदारकी रद्द करुन त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे. खोट्या तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. मोदी सरकारच्या या दडपशाहीविरोधात तसेच राहुल गांधी यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे हा संदेश देण्यासाठी आज मुंबईत मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने मौन […]

अधिक वाचा..

भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार; चंद्रकांत पाटील

मुंबई: कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक यांच्यासह तीन लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे.ही घटना विभागाची प्रतिमा मलिन करणारी आहे.या भ्रष्टाचार प्रकरणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ही दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर विभागीय […]

अधिक वाचा..

अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी

मुंबई: कळवा भागात (दि. १६) रोजी एका कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला. या घटनेची शिवसेना उपनेत्या व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेऊन संवाद साधला आणि त्यांना दिलासा दिला. या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कारवाई करण्याबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांकडे […]

अधिक वाचा..

टीका करणे सोप, पण सर्वसमावेशक कृतीसाठी कुणीच पुढे येत नाही…

राज ठाकरे बोलले, ते अर्धसत्य मुंबई: तरूण पत्रकारांच्या मनात आग आहे, त्यांना काही करून दाखवायचं आहे.. मात्र ते ज्या माध्यमात काम करतात त्यांचे मालकच विकले गेले आहेत.. स्वत:च्या नोक-या टिकविण्यासाठी पत्रकारांना तडजोड करावी लागते”. असं राज ठाकरे मुलाखतीत म्हणाले, लोकमतच्या कार्यक्रमात खा. अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी घेतलेल्या मुलाखतीत,माध्यमांच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे […]

अधिक वाचा..

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): जनतेच्या कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याबद्दल शिरुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिरूर तालुका भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांनी निवेदनाद्वारे पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील बापूसाहेब काळे यांनी अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनानुसार […]

अधिक वाचा..