मुंबई: सुमनालय फाऊंडेशन या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने १९ सप्टेंबर २०२५ रोजी शांतीवन आश्रम शाळेतील वंचित मुलांसोबत प्रेम , बाप्पाचा आशीर्वाद आणि वही आणि लेखन साहित्याचा प्रसाद वाटून गणेशोत्सव साजरा केला. शाळेतील विद्यार्थ्यांनी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी काही शिक्षकांसह सुमनालय फाऊंडेशनच्या अध्यक्ष डाॅ प्रा.सुजाता वॉरियर आणि कोषाध्यक्ष रुद्रन यांचे स्वागत केले .
अंटार्क्टिका, कासा रिओ, पलावा सिटी आणि सुमनालय फाऊंडेशन च्या अध्यक्षांंच्या निवासस्थानी गणेशोत्सवा दरम्यान संंकलित केलेल्या वह्या व लेखन साहित्याच्या स्वरूपातील बाप्पाचा प्रसाद आणि आशीर्वाद स्वीकारले.
शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती पाटील यावेळी सांगितले की , “साक्षरता वाढीसाठी सुमनालय फाऊंडेशन आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे. राष्ट्र उभारणीत शिक्षणतज्ज्ञांसह स्वयंसेवी संस्था, सरकार आणि लोकांचे सहकार्य खूप महत्त्वाचे आहे…”
‘एक पेन एक पुस्तक,वही अभियानातील साहित्याचे वितरण यावेळेस करण्यात आले. वंचित मुले आणि विद्यार्थ्यांसोबत प्रेम वाटण्याच्या सुंदर संदेशासह गणेशोत्सवाचा असा आगळ समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झालेला मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदात दिसत होता.