जिंदगी और कुछ भी नहीं हे प्रेम कळालं, तर तुम्ही आयुष्य जिंकलच…

महाराष्ट्र

वर्धा: सोशल मीडियावर सध्या एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांच्या उड्या पाहायला मिळत आहे. हा फोटो आहे प्रेमाचा…प्रेमाच्या ओलाव्याचा.. आणि एकमेकांच्या काळजीचा. प्रेम कधी मरत नाही असं म्हणतात,आणि हेच वाक्य या फोटोतून अधोरेखित होताना दिसतं. या फोटोत एक वृद्ध दाम्पत्य जे काही करत आहे, त्यातून प्रेम या शब्दाला आणखी वजन येतं.

एका महिला IAS अधिकाऱ्यांने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला एक वृद्ध दाम्पतय दिसतं. अंगावर सुरुकुत्या पडलेल्या, थरथरणारे हात, अंधूक होत चाललेली नजर मात्र तरीही एकमेकांच्या ओढीने आसुसणारा जीव. एकमेकांची तीच काळजी, जी कदाचित नवतारुण्यात असेल, तीच ओढ जी पहिल्या प्रेमाचा पहिला स्पर्श झाल्यानंतर असेल. तोच निस्वार्थ भाव, जो कदाचित प्रेमात पडल्यानंतर आला असेल.

या फोटोत एक आजोबा आणि एक आजी बसलेली दिसते. दूरुन कुणीतरी हा फोटो शूट केला आहे. या फोटोत आजोबा 2 पायांवर बसले आहेत, तर आजी जमिनीवर बसून त्यांना भरवत आहे. आजोबांचं वय जास्त असल्याने वृद्धत्त्वही जास्त आहे. आता एकामेकांशिवाय दोघांना कुणीही नाही, पण आजी जी जबाबदारी दाखवतेय, त्यातूनच त्यांच्या असलेल्या प्रेमाची कल्पना येऊ शकते.