व्यायाम शाळेसाठी मिळणार १४ लाखाचे अनुदान

महाराष्ट्र

संभाजीनगर: राज्यातील युवकांना उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळाव्यात आणि राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत व्यायामशाळा उभारणीसाठी दिले जाणारे अनुदान ७ लाखांवरून थेट १४ लाख रुपये करण्यात आले आहे.

अनुदानवाढीचा इतिहास

२०१२ – सुरुवात २ लाख रुपये

२०१९ – वाढ करून ७ लाख रुपये

२०२५ – आता वाढ करून थेट १४ लाख रुपये

आदेश निर्गम दिनांक: २३ एप्रिल २०२५

अनुदानाचा उद्देश

ग्रामीण आणि शहरी भागात व्यायामशाळा उभारणे

गुणवत्तापूर्ण क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे

नव्या खेळाडूंना योग्य सुविधा मिळवून देणे

अनुदान कशासाठी वापरता येईल

व्यायामशाळेचे बांधकाम

व्यायाम साहित्य खरेदी

मुलभूत सुविधा उभारणी

अर्ज कसा व कुठे करायचा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा

शक्य नसल्यास तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयात देखील अर्ज करता येतो

अर्जासाठी आवश्यक अटी व कागदपत्रे

योग्य व पुरेशी जागा (स्वताची किंवा भाड्याने घेतलेली)

अंदाजपत्रक (बजेट) तयार करून सादर करणे

व्यायामशाळा योग्यरीत्या चालवण्याचे हमीपत्र