संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये वटसावित्री पौर्णिमेपूर्वी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली. पिंपळाला ७ फेरे मारून कायद्याचा दुरुपयोग करून पतीच्या कुटुंबाला वेठीस धरणारी, आयुष्य उध्वस्त करणारी पत्नी यापुढे नको अशी प्रार्थना केली.तसेच पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकतर्फी व्यवस्थेविरोधात साकडे घालण्यात आले.
या वेदनेमागे काय होत. चला जाणून घेऊया
मुख्य आरोप आणि वेदना
कायद्याचा गैरवापर: पुरुषांनी सांगितलं की महिला सबलीकरणाच्या नावाखाली बनवलेले अनेक कायदे आता पुरुषांविरुद्ध वापरले जात आहेत.
खोट्या तक्रारी: काही महिला खोट्या तक्रारी करत पतीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास देतात.
समान न्यायाची मागणी: पुरुष व महिला असा भेद न करता, कायद्याने दोघांनाही समान न्याय मिळायला हवा, ही मागणी होती.
अहवालात उघड झालेलं वास्तव
नवी दिल्लीतील NCRB रिपोर्ट (2024) नुसार:
2023 मध्ये तब्बल 1.20 लाख विवाहित पुरुषांनी आत्महत्या केली. ही संख्या विवाहित महिलांच्या आत्महत्येपेक्षा तब्बल 3 पट अधिक होती. हे आकडे पुरुषांवरील मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर दबावाचे गंभीर वास्तव मांडतात.
व्यवस्थेकडून अपेक्षाभंग
2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 498A च्या गैरवापरावर आळा घालण्याचे निर्देश दिले होते. तरीही अनेकदा स्थानिक पोलीस महिलांच्या तक्रारी ऐकून थेट पतीला अटक करतात, असा आरोप करण्यात आला.
सामाजिक बदलाची गरज
पुरुष हा केवळ एक पती नव्हे, तर कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. त्याच्या वेदनांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे संपूर्ण कुटुंबव्यवस्थेला अंधारात ढकलणं.
जसं महिलांसाठी अनेक चळवळी उभ्या राहिल्या, तसंच आता पुरुषांच्या हक्कांसाठीही आवाज उठवायला हवा. कायद्यात योग्य बदल व्हावेत, समाजाने पुरुषांचंही दु:ख ऐकावं आणि त्यांच्या बाजूनेही उभं राहाव. हीच खरी गरज आहे.