संभाजीनगर: झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकीकडे मद्यावरील शुल्कात वाढ करून मद्यप्रेमींना धक्का दिला आहे, तर दुसरीकडे मोठी पदभरती आणि विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करून दिलासाही दिला आहे.
मद्यप्रेमींची चिंता वाढली
झालेल्या बैठकीत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर (IMFL) तब्बल दीड टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल १४ हजार कोटींचा महसूल वाढणार आहे.
नवे दर काय असतील? (१८० मिली)
देशी मद्य: ₹८०
महाराष्ट्र मेड लिकर: ₹१४८
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य: ₹२०५
विदेशी मद्याचे प्रीमियम ब्रँड: ₹३६०
यासोबतच, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना सीलबंद विदेशी मद्य भाडेतत्त्वावर विकण्यास मान्यता देण्यात आली आहे, ज्यावर १० ते १५ टक्के अतिरिक्त शुल्क लागेल.
‘तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!`
राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती
राज्य उत्पादन शुल्क विभागाला अधिक बळकट करण्यासाठी, विभागात तब्बल १२२३ नवीन पदे भरली जाणार आहेत. तसेच अनेक नवीन विभागीय आणि अधीक्षक कार्यालये सुरू केली जाणार आहेत. विभागाच्या कामकाजासाठी एआय (AI) आधारित कंट्रोल रूम भी उभारली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात मोठी वाढ
शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात ₹६,२५० ने वाढ.
पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात र१०,००० ने वाढ.
बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ₹८,००० विद्यावेतन मिळणार.
समाजासाठी महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणले जाणार आहे, ज्यामुळे अनुसूचित जातीच्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.