मध्यरात्री जिवंत माणसाच्या दारात नैवेद्य ठेवायचा अन् राम नाम सत्य है म्हणायचा हा काय प्रकार…

महाराष्ट्र

बीड: संतोष देशमुख खून प्रकरणातला क्रमांक एकचा आरोपी वाल्मिक कराडचा पंटर गोट्या गित्तेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी हा व्हिडीओ शेअर करत गोट्या गित्तेचा क्रूरपणा जनतेसमोर आणला आहे.

गोट्या गितेची एखाद्याला मारण्याची स्टाईल जरा निराळीच होती. ज्याला संपवायचा आहे त्याच्या दारात मध्यरात्री नैवेद्य ठेवायचा, त्यानंतर तिथेच राम नाम सत्य है.. अशा घोषणा द्यायच्या आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचा जीव घ्यायचा. गोट्या गित्तेने बीड जिल्ह्यातल्या अनेकांना संपवलं, असं सुरेश धसांसह इतरांनी म्हटलेलं आहे.

गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा शूटर होता. सध्या तो फरार आहे. त्याने वाल्मिकच्या सांगण्यावरुन महादेव मुंडेंचा खून केल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला आहे. सरपंच बापू आंधळेंचाही खून गोट्या गित्तेनेच केल्याचं परळीकरांना माहिती आहे, परंतु दहशतीमुळे कुणी बोलत नाही. असे अनेक खून गोट्या गित्तेने केल्याचं स्वप्निल गलधर त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात.

स्वप्निल गलधर यांची फेसबुक पोस्ट

हे आहेत परळीचे महाशय गोटू गित्ते.. हल्ला करणे, खून करणे, हात तोडने, पाय तोडणे, बापू आंधळेला सोबत नेऊन गोळी मारणे.. महादेव मुंडे, सातभाई, स्वप्नील पुजारी, मातंग समाजातील एक गरीब तरुण अशा अनेक घटना आहेत.जिवंत माणसाच्या दारात नैवेद्य ठेवून त्याला मारायची धमकी देणे, माणूस मारल्यानंतर त्याचे मास घेऊन फिरणे, मालकाने सांगितलं होतं नरडीचा घोट घेऊन ये, हा महादेव मुंडे यांच्या गळ्याचं मांस घेऊन हिंडत होता आणि याच्याच फिर्यादीवरून बापू आंधळे यांचा FIR दाखल होतो.

पोस्टमध्ये गलधर पुढे म्हणतात, याचा परळीतील उन्माद पाहून याच्यावर गुन्हाही दाखल होत नाही. हे पाहूनच पुढे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्याची हिम्मत व क्रूरता त्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि इतरांना आली. मग पुढे रील बनवणे, व्हिडीओ बनवणे, बाप तो बाप रहेगा.. असे पोस्ट सोडणे, मूर्ख आणि जंगलीपणा असा होता यांचा. संतोष देशमुख यांचा देह PM रूम मध्ये असताना हे लोक केजमध्ये आरोपी विष्णू चाटेच्या वाढदिवसाचे बॅनर लावून त्यावर लिहीत होते बाप तर बाप असतो म्हणून.उमा किरणमधील अत्याचाराची घटना झाल्यावर एका विकृत माणसाने नाहोली गावात पाण्याच्या टाकीवर चढून वाल्मिक कराड याला सोडून द्या म्हणणारा नाना चौरे यांने एका मराठा समाजाच्या गतिमंद मुलीवर अत्याचार केला.. ज्या मुलीच्या नातेवाईक महिलेने ही घटना पाहिली तिला जीवे मारण्याची धमकी दिली. माणूस म्हणून जन्माला आलोत हा संस्कार कुठे तरी सत्तेच्या मस्तीत आपण विसरोल की काय