OYO मध्ये अविवाहित जोडप्यांना No एन्ट्री कारण काय? जाणून घ्या…

महाराष्ट्र

OYO हॉटेल्सने त्यांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता अविवाहित जोडप्यांना OYO हॉटेल्समध्ये चेक-इन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Oyo नेमका असा निर्णय का घेतला

2013 पासून सुरू झालेल्या OYO ने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातून सुरू झालेला हा नवीन नियम लवकरच संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. यामुळे अनेक प्रश्न उभे राहत असून OYO आपली ओळख बदलण्याचा प्रयत्न करतंय.

कंपनीची भूमिका

OYO च्या उत्तर भारत क्षेत्र प्रमुख पावस शर्मा यांनी सांगितलं की, “आम्ही लोकांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो, पण ज्या भागात आमचा व्यवसाय आहे, तिथल्या कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे.

नवीन नियमांनुसार, ग्राहकांना OYO मध्ये बुकिंगसाठी *लग्नाचा पुरावा द्यावा लागणार आहे.

OYO चा उद्देश

नवीन नियमांमुळे OYO हॉटेल्स आता कुटुंब, व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी आणि एकटे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित आणि जबाबदार सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. ग्राहकांचा विश्वास वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचं दिसतं.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय

या निर्णयामुळे सोशल मीडियावर मिम्स आणि चर्चांचा पूर आला आहे.लोलकांचे मत वेगवेगळे असले तरी, OYO च्या या धोरणाकडे एक महत्त्वाचा बदल म्हणून पाहिले जात आहे.