कुत्रे आडवे गेल्याने 22 वर्षीय मोटरसायकल चालकाचा मृत्यू 

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील इंदिरा नगर येथे मोटार गॅरेज समोर झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला असुन या अपघातात हितेश इंदल साहू (वय २२), रा. नवगाव करंजीया, ता. जि. बेमीतेरा, छत्तीसगड येथील बावीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असुन . मयत युवक हा बांधकाम मजुर म्हणून काम करत होता

त्याचे सहकारी दिलीप रामकिसन निशाद (वय ३१) रा. टाकळी हाजी, मूळ रा. धनगाव, छत्तीसगड) याने याबाबत पोलीस स्टेशनला खबर दिली असुन पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हितेश मोटारसायकलवरून जात असताना अचानक रस्त्यावर कुत्रे आल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो जोरात रस्त्यावर पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असल्याने त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्या त्याचा मृत्यू झाला असुन या अपघाताचा आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वारे करीत आहेत.