शिरूर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश रत्नपारखी यांची निवड 

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई येथील रेशन दुकानदार व सामाजिक कार्यकर्ते गणेश माधव रत्नपारखी यांची शिरूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली.

शिरूर येथे पार पडलेल्या कार्यकारणीच्या मीटिंगमध्ये त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सचिव पदी संतोष सरोदे, सहसचिव पदी सचिन नरवडे यांची निवड करण्यात आली. तसेच नवीन कार्यकारणी मध्ये माळी डी. आर, रोहिदास दंडवते, नवनाथ खैरे, गवारे सचिन नरवडे, राहुल थोरात, राऊतकाका, खंडागळे, सुनील गंगावणे यांची निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल घोडगंगा सहकारी साखर कारखानाचे माजी संचालक राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, सरपंच सुनीता पोकळे, उपसरपंच उत्तम जाधव, माजी सरपंच बबनराव पोकळे, रामदास सांडभोर, दीपक रत्नपारखी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डांगे, दत्तात्रय सांडभोर, बाजीराव उघडे, माजी उपसरपंच कुशाबा मुंजाळ, निखिल घोडे, विठ्ठल मुंजाळ, सोसायटी चेअरमन विक्रम इचके, सोसायटी सदस्य रितेश शहा, माजी चेअरमन बबनराव पोकळे, पिडीसीसी बँक मॅनेजर राजेंद्र चाटे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर रोकडे, राजेंद्र इचके, युवा नेते अविनाश पोकळे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोर, किसन हिलाळ, सचिन बोराडे, बाळशीराम मुंजाळ, पत्रकार अरुणकुमार मोटे, बीएसएनएलचे व्यवस्थापकीय अधिकारी अप्पा उचाळे, तसेच तालुक्यातील सर्व रेशनदार दुकानदार यांनी त्यांचे अभिनंदन केले.