ओढयाच्या पाण्यातून शाळेत जाण्यासाठी विध्यार्थ्यांसाठी जीवघेणा प्रवास

शिरूर तालुका

सविंदणेत विविध ठिकाणी ओढयावर पुलाची मागणी….

सविंदणे: सध्या शिरुर तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून ओढया नाल्यांना मोठे पूर आले आहेत. सविंदणे येथे लोणी- धामणीवरुन वाहणाऱ्या ओढयावर सविंदणे गावच्या उत्तर बाजूला भोरवस्ती, पडवळमळा, मडके आळी, किठेमळा, प्रगती नगर अशा लोकवस्त्या शेताच्या ठिकाणी सोईनुसार मोठया प्रमाणात विखुरल्या आहेत.

ओढयावर पुल नसल्यामुळे जीवघेणा मार्ग काढत ओढयाच्या कमरे इतक्या पाण्यातून मार्ग काढत विद्यार्थ्यां शाळेत जाण्यासाठी धक्कादायक प्रवास करत आहे. तसेच नागरीकांचे दळणवळणासाठी पुल नसल्याने प्रंचड हाल होत असून ओढयांवरील पुलाचे काम करण्यासाठी नागरीकांची मागणी आता जोर धरु लागली आहे.

बऱ्याच दिवसापासून अनेक पुलांची, विकास कामांची मागणी होत असताना राजकीय उदासिनता दिसून येत असून सविंदणे गावाला अपूरा निधी उपलब्ध होत असल्याची खंत ऊपसरपंच भाऊसाहेब लंघे यांनी व्यक्त केली आहे.