देशमुख, राऊतांना ईडी लावता, मग कराडला का नाही

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खा सुप्रिया सुळे बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांन संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खा सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. शहरात वाहतुकीचे नियोजन नाही. त्यामुळे वाहतुक कोंडी वाढलीय. त्यासोबतच उपनगरातील पाणी, कचरा या समस्या देखील सोडवल्या गेलेल्या नाहीत. […]

अधिक वाचा..

८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा

पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी  पालघर: पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीवर विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्र. २९१/२०२४ नोंदवण्यात आला आहे. सदर आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे.आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने […]

अधिक वाचा..

घोड धरणातील अवैध वाळू उपशावर महसुल आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

शिंदोडी (तेजस फडके) घोड धरणातुन अवैधरीत्या वाळू उपसा करुन वाहतुक करणाऱ्या हायवावर शिरुर महसुल विभाग आणि पोलिसांनी गुनाट-चिंचणी रस्त्यावर संयुक्त कारवाई करत दोन हायवा ताब्यात घेतले आहेत. या दोन हायवा मध्ये प्रत्येकी चार ब्रास प्रमाणे आठ ब्रास वाळू असल्याचे महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.   घोड धरणातील अवैध वाळू उपशाबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा तालुक्यात वाळु माफियावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबधित व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी शिरुर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात सोमवार (दि २३) रोजी रात्री […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पती-पत्नीची एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाणीची फिर्याद…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात पती आणि पत्नीने एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाणीच्या तक्रारी दाखल केल्या असुन पतीने पत्नीला सांभाळण्यासाठी नकार दिल्याने सासरकडच्या मंडळींनी जावयासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली. तसेच जावयाने पत्नीसह तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याने शिरुर पोलिस स्टेशन मध्ये पती व पत्नीने एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.   याबाबत शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

महायुतीला अखेर मुहूर्त मिळाला… अशोक पवारांच्या विरोधात माऊली कटके

शिरुर (तेजस फडके) शिरुर-हवेलीतील महायुतीचा तिढा अखेर सुटला असुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडुन माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शिरुर-हवेली मतदार संघात आता साहेबांची राष्ट्रवादी विरुद्ध दादांची राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. माऊली कटके यांनी नुकताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातुन अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीच्या विरोधात २८ ऑगस्टला पुणे-नगर महामार्ग अडवुन रास्ता रोको आंदोलन

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतील विषारी केमिकलचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडून देत असल्यामुळे निमगाव भोगी, आण्णापुर, रामलिंग, कर्डीलवाडी, सरदवाडी, कारेगाव, शिरुर-ग्रामीण, ढोकसांगवी या गावातील ओढे-नाले, विहिरी, बोअरवेलचे पाणी पुर्णपणे दुषित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) हि कंपनी कायमस्वरुपी बंद करण्यात यावी […]

अधिक वाचा..

शिरुर येथील ‘सेंट जोसेफ’ शाळेत डिजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत डान्स करणे शिक्षकांना भोवले; तब्बल १७ जणांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील नावाजलेल्या ‘सेंट जोसेफ’ या शाळेत रात्रीच्या वेळेस डिजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत डान्स करणे शिक्षकांना चांगलेच भोवले असुन शाळेतील काही शिक्षकांसह तब्बल १७ जणांवर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अशा मद्यपी शिक्षकांचा शाळेतील विद्यार्थ्यांनी नक्की काय आदर्श घ्यायचा अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. जर […]

अधिक वाचा..
RANJANGAON

रांजणगाव MIDC तील जामिल कंपनीत कामगाराच्या मृत्यू प्रकरणी प्रोडक्शन मॅनेजर व सुपरवायझरवर गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC तील जामिल स्टील बिल्डिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जड जॉब हाताळता न आल्याने शिवबाबू कमलेश शाहू (वय २३) मुळ रा. मनकापुर, ता. मजखनपुर, जि.कोसंबी (उत्तरप्रदेश) याचा मृत्यू झाल्याने कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर जयदेव दशरथ मांडे तसेच बिल्डिंग विभागाचे सुपरवायझर ज्ञानेश्वर दुर्गादास शेंडे यांच्या विरुद्ध रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

शिरुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा…

शिरुर (अरुणकुमार मोटे) बदलापुर (मुंबई) येथील शाळेतील साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज (दि २१) रोजी शिरुर येथील इंदिरा गांधी पुतळा ते तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार […]

अधिक वाचा..