तळेगाव ढमढेरेत धावत्या दुचाकीवर बिबट्याला हल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील कासारी फाटा रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीच्या धावत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केल्याने दुचाकीस्वार व्यक्तीची पत्नी व मुलगा किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली असून परिसरात नागरिक भयभीत झाले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील नवनाथ नरके हे पत्नी उर्मिला व मुलगा विराज याच्यासह दुचाकीहून नातेवाईकांकडे गेलेले असताना मंगळवार ११ […]

अधिक वाचा..

राज्यातील पोलीसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढल्याने पोलीसांनाच संरक्षण देण्याची वेळ

मुंबई: राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस 24 तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात तीसहून अधिक हल्ले पोलीसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. या […]

अधिक वाचा..

कांदा खरेदीवरुन धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक…

मुंबई: राज्यभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, शेतकरी संकटात सापडला असताना झोपलेले सरकार कांद्याचा प्रश्न पेटल्यानंतर आता नाफेडने खरेदी सुरू केल्याचा बनाव करत आहे. रब्बी हंगामातील रांगडा कांदा खरेदी करण्याची सुरुवात नाफेडने दोनच दिवसापूर्वी केली असल्याचे स्वतःहून जाहीर केले. तसेच केवळ काही शेकड्यात कांदा नाफेडने खरेदी केला, शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून सरकार बनाव […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या राऊतवाडीत बिबट्याचा वासरावर हल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडल्याने शेतकरी भयभीत झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील सदाशिव राऊत हे त्यांची जनावरे गोठ्यात बांधून झोपलेले असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोठ्यातून कुत्रे भुंकण्याचा व गाय ओरडण्याचा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर, हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ…

शिरुर: पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमध्ये यापूर्वी बिबट्याचा वावर प्रामुख्याने दिसून येत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत शिरुर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. जनावरे आणि माणसांवरील हल्लेही वाढत असल्याचे दिसून येत असून, याच आठवड्यात हल्ल्याच्या तीन-चार घटना घडल्या आहेत. पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरुर तालुक्यातील चित्र सिंचनामुळे बदलले असून उसाची […]

अधिक वाचा..