धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. ठाकरे गटाने आपला युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर आता शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅड. नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद सुरू केला आहे. दरम्यान, कौल यांनी न्यायालयात काही महत्त्वाची कागदपत्रे सादर केल्याने या सुनावणीकडे सर्वांचे […]

अधिक वाचा..

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. मात्र, त्याआधीच प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “आमचा युक्तिवाद जोरदार झाला आहे. आपल्या विरोधात निकाल जाणार असल्याचे शिंदे गटातील आमदारांना एव्हाना कळून चुकले आहे,” असा […]

अधिक वाचा..

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९ मध्ये बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व आणि महाराष्ट्रातील जनतेचे बहुमत गोठवले. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली जात आहे. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि धोरण पुसण्याचे काम सुरू आहे,” अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या […]

अधिक वाचा..

‘धनुष्यबाण’ गोठवण्याच्या मागणीवरून शिवसेनेचा उबाठावर बोचरा प्रहार

मुंबई : शिवसेनेचे पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी उबाठा गटाने न्यायालयात केल्यानंतर शिवसेनेने सोशल मीडियावर बोचरे व्यंगचित्र प्रसिद्ध करत उबाठा गटावर जोरदार निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे न्यायालयासमोर उभे राहून, ‘यांच्याकडे बाळासाहेबांचे विचारही आहेत, तेही गोठवा,’ असे म्हणताना दाखवण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला भगवा ध्वज, धनुष्यबाण आणि वाघासह शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..