अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच भावाचाही मृत्यू
साखरखेर्डा: येथील शशिकला रामकृष्ण सुरळकर (वय ८०) यांचे ११ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता रोकडोबा हनुमान मंदिरामागील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांसह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. यवतमाळ येथे वास्तव्यास असलेले त्यांचे धाकटे बंधू राम नामदेव ढोबळे हेही बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी साखरखेर्डा येथे आले होते. […]
अधिक वाचा..