मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी देणार; अजित पवार 

मुंबई: मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा इमारतींच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारमतींच्या प्रश्नासंदर्भात विधानपरिषद सदस्यांनी मांडलेल्या भावनांचा सकारात्मक विचार केला जाईल. सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्या […]

अधिक वाचा..

पुनमनगर येथील पीएमजीपीच्या १७ धोकादायक इमारतींचा पुनर्विकास म्हाडाने तात्काळ करावा

मुंबई: जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील पुनमनगर येथील धोकादायक १७ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाने तात्काळ सुरू करून येथील रहिवाशांच्या जिवीताचे रक्षण करावे, अशी मागणी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी मंगळवारी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली. येथील इमारत क्रमांक ४ च्या चौथ्या माळ्यावरील एका घरातील सिलिंगचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. […]

अधिक वाचा..

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार

मुंबई: मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या डागडुजीवर होणारा खर्च, मालमत्ता कर, जल आकार आणि सामायिक विद्युत देयक यासाठी प्रति महिना साधारणपणे दोन हजार रुपये इतका खर्च येतो. या खर्चासाठी मार्च २०१९ पर्यंत २५० रुपये प्रति महा इतके सेवाशुल्क करण्यात येत होते. मात्र एप्रिल २०१९ पासून यामध्ये वाढ करून ५०० रुपये प्रति महिना इतके सेवाशुल्क आकारण्यात येत […]

अधिक वाचा..