काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी ३ दिवसीय निवासी शिबिर

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे चिपळूण येथे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, २७ फेब्रुवारीपासून या शिबिराला सुरुवात होणार असून १ मार्च रोजी सांगता होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमध्ये कोकण विभागातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या सर्व उमेदवारांसाठी हे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला […]

अधिक वाचा..

मतदानादरम्यान धक्कादायक प्रकार! उमेदवाराच्या लहान मुलाने दाबले ईव्हीएमचे बटण

अकलूज: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असतानाच अकलूज येथील यशवंत नगर मतदान केंद्रावर एक अनोखी आणि चर्चेची घटना घडली. जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या लहान मुलाने थेट ईव्हीएम मशीनचे बटण दाबल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मतदान केंद्रावर गोंधळ घटनेची माहिती मिळताच मतदान केंद्रावर उपस्थित […]

अधिक वाचा..

कारेगाव गणात ‘तुतारी’ विरुद्ध ‘घड्याळ’ शरद पवार आणि अजित पवार गटाचे उमेदवार थेट आमने-सामने

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजताच शिरुर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फाटाफुटीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेत दोन्ही गटांनी समन्वय साधत एकत्र निवडणुक लढवण्याचा प्रयत्न केला.पण तरीही शिरुर तालुक्यात कारेगाव पंचायत समिती गण हा त्याला अपवाद ठरत आहे. या गणात शरद पवार […]

अधिक वाचा..

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी  कल्याण डोंबिवली: कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. यामुळे यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील देखील विजयी झाल्या आहेत. […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने व ताकदीने उमेदवार उतरवणार; सुनिल तटकरे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची जी तिसरी यादी जाहीर होईल त्यामध्ये सर्व उमेदवार पूर्ण ताकदीचे व क्षमतेचे असतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केला. सोलापूर, रायगड जिल्ह्यातील पनवेल, कोल्हापूर, नाशिक या सर्व ठिकाणी महायुती म्हणून निवडणूका लढल्या जात आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व […]

अधिक वाचा..

नोकरी १०वी पास उमेदवारांना महापारेषण छ. संभाजीनगर अंतर्गत बिना परीक्षा मिळणार सरकारी नोकरी

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO), छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अंतर्गत वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) पदांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती बिना परीक्षा असून १०वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. पदाचे नाव – वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) एकूण जागा – 08 नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक – 400 केव्ही […]

अधिक वाचा..

अनुकंपावरील १० हजार पदे भरण्याचा निर्णय! उमेदवारांच्या नियुक्तीचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

मुंबई: गेल्या पाच वर्षांपासून अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे १० हजार जणांचे नोकरीचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. राज्य सकार, निमसरकारी संस्थामधील अनुकंपाच्या सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सप्टेंबरपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही नियुक्ती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. शासकीय अथवा निमशासकीय संस्थेतील एखाद्या कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन […]

अधिक वाचा..

गिग कामगारांचे हक्क, पुणे येथील MPSC च्या अपघातग्रस्त उमेदवारांची संधी आणि पुणे नाट्यगृहांची दुरवस्था

पुणे: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासास महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तीन प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर निवेदनं सादर केली. या निवेदनांमध्ये अ‍ॅप आधारित गिग व प्लॅटफॉर्म सेवा क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांचे रक्षण, अपघातग्रस्त व अपंग उमेदवारांसाठी परीक्षेची विशेष संधी, आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नाट्यगृहांच्या […]

अधिक वाचा..

विधानसभेत पराभूत झालेल्या मविआच्या १०० उमेदवारांची न्यायालयात याचिका

मुंबई: लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ लाख मतदार अधिक वाढले आहेत. विशेष म्हणजे २०१९ […]

अधिक वाचा..

वायुसेनेत अग्निवीरांची नवीन भरती, १२ वी उत्तीर्ण उमेदवार करु शकतात अर्ज…

औरंगाबाद: वायुसेनेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वायुसेनेने अग्निवीर वायु भरतीची नोटीफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून या संदर्भात उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. यात तरुण आणि तरुणीही अर्ज करु शकतात. देशभरात अग्निवीरच्या माध्यमातून नौदलात भरतीची प्रक्रिया सुरू आहे, आता वायुदलातही भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. वायुसानेसाठी लेखी परीक्षा २० […]

अधिक वाचा..