Video; न्हावरे येथील घोडगंगा कारखान्याच्या भंगाराला आग; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे वेळीच आग आटोक्यात

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) न्हावरे (ता. शिरुर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील भंगारात पडलेल्या केमिकलच्या ड्रममध्ये असलेल्या केमिकलने दुपारी 3:30 ते 4:00 च्या सुमारास पेट घेतल्याने आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सोशल मिडीयावर काही वेळातच त्या आगीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. परंतु रांजणगाव MIDC तसेच शिरुर नगरपरीषद येथील अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत आल्याने आग नियंत्रणात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील भंगारात पडलेल्या केमिकलच्या ड्रममध्ये असलेल्या केमिकलने भर उन्हात 3:30 ते 4:00 च्या सुमारास पेट घेतल्याने आजुबाजुला पडलेल्या मोकळ्या पोत्यांनी तसेच वाळलेल्या गवताने पेट घेतला. काही वेळातच आगीच्या ज्वाळामुळे मोठं मोठया धुराचे लोट दिसु लागल्याने स्थानिक लोकांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ काढुन मोठया प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल केले.

 

हि आगीची बातमी कळताच आमदार अशोक पवार विस मिनिटात कारखान्यात दाखल झाले. हि आग विझविण्यासाठी सागरराजे निंबाळकर यांनी स्थानिक पाण्याचे टँकर बोलावून घेत शर्थीचे प्रयत्न करत पुढाकार घेतला. आग लागल्यानंतर रांजणगाव MIDC तसेच शिरुर नगरपरीषद येथील अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत आल्याने आग नियंत्रणात आली. तसेच वाघोली येथुन PMRDA च्या अग्निशमन दलाची गाडीही आग विझविन्यासाठी मदतीसाठी आली होती.

 

यावेळी घटनास्थळी कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार पक्ष) तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, राष्ट्रवादी पक्षाचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष रविंद्र काळे, घोडगंगाचे संचालक दादा पाटील फराटे, नरेंद्र माने, बिरा शेंडगे, संभाजी फराटे, मानसिंग कोरेकर, घोडगंगाचे माजी संचालक सुधीर फराटे, दत्तात्रय फराटे, शरद चकोर, राहुल कर्पे, विशाल घायतडक आदी यावेळी उपस्थित होते.

 

या आगीबाबत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दुपारी 3:30 ते 4:00 च्या सुमारास कारखान्याच्या आवारातील भंगारात पडलेल्या केमिकलच्या ड्रममध्ये असलेल्या केमिकलने पेट घेतल्याने आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत आल्याने आग आटोक्यात आली. त्यामुळे जास्त नुकसान झाले नाही.

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिरुर; नेत्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्याने निष्ठावंत शिवसैनिक आजोबांनी ;त्या कार्यकर्त्याला सुनावले

शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान