शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार महिलांचा रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या महिलांचा शाल,श्रीफळ,गुलाब फुल देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच त्यांना या वेळी डस्टबिन भेट म्हणून देण्यात आले.
रामलिंग ग्रामपंचायत मधील या महिला आपले काम प्रमाणिकपणे करत असतात. कोणतेही काम असो, त्यात कमीपणा न मानता ते करायचे. तुम्ही जे स्वच्छ्ता ठेवण्याचे काम करता, हे काम खूप मोठे आहे. त्यामुळे याचा आपल्याला नेहमी अभिमान पाहिजे. तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर मी नेहमी तुमच्या सोबत आहे असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले.
यावेळी गीता आढाव, रुपाली बोर्डे, ज्योती पारधी, आरती चव्हाण, गायत्री डींगरे,पुनम नेवसे, मयुरा दळवी, ज्ञानेश ब्राम्हणे अमोल राठोड, सागर दांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरुर; निकृष्ट पोषण आहार पुरविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा रामलिंग महिला उन्नतीची मागणी
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने भिल्ल वस्तीतील मुलांसोबत धुलिवंदन
शिरुर एस टी आगारातील महिला प्रसाधनगृहाची दुरावस्था; रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने आंदोलनाचा इशारा