मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा; नसीम खान

मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु नंतरच्या सरकारने हे आरक्षण कायम ठेवले नाही. हे आरक्षण धर्माच्या आधारित नाही, शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यासाठी हे आरक्षण देण्यात आले होते. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मागासलेपणानुसार मुस्लिम आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम […]

अधिक वाचा..

‘स्वच्छता मॉनिटर्स’नी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले; दीपक केसरकर

मुंबई: ‘लेट्स चेंज’ प्रकल्पांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य देशालाही दिशा दाखवेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्वाचा विकासदेखील आवश्यक असतो, या उपक्रमाच्या माध्यमातून तो साध्य होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने […]

अधिक वाचा..

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश

शिक्रापूर (शेरखान शेख): धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी पुणे जिल्ह्यातून तीन शाळांची निवड करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण पुणेच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे. समाजातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये व उच्च शिक्षणाच्या बदलत्या […]

अधिक वाचा..

मॅनहटन कम्युनिटी कॉलेज समवेत करार…

कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत मुंबई: मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो सोबतच्या करारामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण कमी खर्चात उपलब्ध होणार असून कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास आणि रोजगार उपलब्ध होण्यास देखील निश्चितच मदत होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी […]

अधिक वाचा..

महासंघाच्या एका झेंड्याखाली चर्मकार समाजाने संघटित होण्याची गरज…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील काठापूर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी चर्मकार समाजाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या झेंड्याखाली संघटित होण्याची गरज असल्याचे सांगितले. या देशात स्वातंत्र्यानंतर पहिले संघटन क्रांतीकारी नेते मा. बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाने या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव पातळीवर संघटन उभे राहिले आहे. त्यामुळे चर्मकार समाजावरील अन्यायाविरुद्ध आवाज राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

कुणबी जोडो अभियानातून रायगडमध्ये एकटवला कुणबी समाज

पोलादपूर: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 75 वर्षे होऊनही कोकणातील कुणबी समाज उपेक्षितच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी तसेच समाज संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आता कुणबी जोडो अभियानाला सुरुवात झाली आहे. कुणबी जोडो अभियानातून रायगडमध्ये कुणबी समाज एकटवला आहे. महाड तालुक्यात काळ हजारोंच्या संख्येने समाजबांधव एकत्र आले. डिसेंबर 2022 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कोकणातील कुणबी जोडो अभियानाची सुरुवात […]

अधिक वाचा..

टाकळी भिमातील मशिदीचा विकास करा मुस्लीम समाजाची आमदार अशोक पवारांकडे मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील मुस्लीम समाजाचे प्रार्थनास्थळ असलेल्या मशिदीची काही प्रमाणात दुरवस्था झालेली असल्याने सदर मशिदीच्या सुशोभीकरणासाठी निधी देत विकास करावा, अशी मागणी मुस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे केली आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील सर्व समाजाचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत सर्व सन उत्सव एकोप्याने साजरे करत असतात. येथील मुस्लीम […]

अधिक वाचा..