महासंघाच्या एका झेंड्याखाली चर्मकार समाजाने संघटित होण्याची गरज…

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील काठापूर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी चर्मकार समाजाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या झेंड्याखाली संघटित होण्याची गरज असल्याचे सांगितले. या देशात स्वातंत्र्यानंतर पहिले संघटन क्रांतीकारी नेते मा. बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाने या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव पातळीवर संघटन उभे राहिले आहे. त्यामुळे चर्मकार समाजावरील अन्यायाविरुद्ध आवाज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या संघटित शक्तीमुळेच समाजाला न्याय मिळू शकतो. हे आपण अनेक अन्यायविरुद्धच्या मोर्चाद्वारे दाखवून दिले आहे.

यासाठी चर्मकार समाजाने आपले हेवेदेवे बाजूला सोडून एक झेंडा, एक नेतृत्व याखाली संघटित शक्ती उभी करण्याची गरज असल्याचे चर्मोद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक शशिकांत सोनवणे यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भूमिका व चर्मकार समाजाचा आयोग संघटनेमुळेच झाल्याचे सांगून संत रोहिदास याचे विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या वेळी विजेंद्र गद्रे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, कार्याध्यक्ष अतुल कानडे ,राज्य कार्यकारी सदस्य जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र कांबळे, जिल्हा महिला अध्यक्ष शुभांगी गाडेकर, जिल्हा महिला संघटक अश्विनी इसवे, उपाध्यक्ष माया खैरे,रामलिंग पतसंस्था चेअरमन राणी कर्डीले, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, संत रोहिदास महाराज संस्था महिला अध्यक्ष शोभा लोंढे, सचिव सुनिता लोंढे, शिरूर तालुकाध्यक्ष तुषार अडसूळ, शिरूर शहर अध्यक्ष विशाल पोटे, कार्याध्यक्ष कैलास सातपुते उपाध्यक्ष रमेश जगताप, त्याचबरोबर गावातील सरपंच उपसरपंच स्थानिक चर्मकार समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघ शाखा काठापूर येथील कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाच्या शाखाध्यक्षपदी संभाजी बबन लोंढे अध्यक्ष संतोष विष्णू लोंढे, उपाध्यक्ष सत्यवान विठ्ठल लोंढे, सचिव दत्ता केरु लोंढे, खजिनदार व इतर अनेक शाखा पदाधिकारी म्हणून या ठिकाणी निवड नियुक्ती पत्र देण्यात आली. महिला पदाधिकारी यांचीही निवड करण्यात आली. यावेळी शिंगवे भागडी, पिंपरखेड, शिरुर येथील बहुसंख्य चर्मकार समाज बहुसंख्यने उपस्थित होता.