टाकळी भिमातील मशिदीचा विकास करा मुस्लीम समाजाची आमदार अशोक पवारांकडे मागणी

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील मुस्लीम समाजाचे प्रार्थनास्थळ असलेल्या मशिदीची काही प्रमाणात दुरवस्था झालेली असल्याने सदर मशिदीच्या सुशोभीकरणासाठी निधी देत विकास करावा, अशी मागणी मुस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे केली आहे.

टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील सर्व समाजाचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत सर्व सन उत्सव एकोप्याने साजरे करत असतात. येथील मुस्लीम समाजाचे प्रार्थनास्थळ असलेल्या जामा मशीदची सध्या दुरवस्था झालेली असून मशिदीच्या संरक्षण भिंत, प्लेव्हिंग ब्लॉक तसेच प्रवेशद्वार साठी निधी उपलब्ध करुन येथील मशिदीला संरक्षण भिंत व आदी कामे करण्याची मागणी नुकतीच अशपाक मोमीन, फिरोजभाई तांबोळी, शारुक मुलाणी, अहेमत शेख, इकबाल मुलाणी, हामजा मुलाणी यांसह आदींनी आमदार अशोक पवार यांना निवेदन देत केली असून यावेळी पुढील काही कालावधी मध्ये सदर काम नक्कीच मार्गी लावले जाईल असे आश्वासन देखील आमदार अशोक पवार यांनी मुस्लीम बांधवांना दिले आहे.