छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; धीरेंद्र शास्त्रीविरोधात संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध सामाजिक व राजकीय स्तरांवरून या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी दिलेल्या संघर्षपूर्ण लढ्याचा इतिहास लक्षात घेता, त्यांच्या पराक्रमाबाबत कोणतेही अवमानकारक विधान अस्वीकार्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाहीसह मोगल […]

अधिक वाचा..

इराणच्या घडामोडींवरून मंदाना करिमीचे वादग्रस्त वक्तव्य; भारत सोडण्याची तयारी

मुंबई: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातम्यांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याचदरम्यान इराणी वंशाची अभिनेत्री मंदाना करिमी हिने केलेल्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. खामेनेई यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केल्यानंतर आता तिने भारत सोडून मायदेशी […]

अधिक वाचा..

ओटीटीवरील वादग्रस्त कंटेंटवर कडक नियमांची मागणी

‘घुसखोर पंडत’ आणि ‘देवखेळ’वरून राज्य–देशभरात संताप मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेबसीरिजबाबत कठोर नियमावली लागू करावी, अशी जोरदार मागणी देशभरातून होत आहे. नेटफ्लिक्सवरील ‘घुसखोर पंडत’ आणि झी ५ वरील ‘देवखेळ’ या वेबसीरिजभोवती निर्माण झालेल्या वादामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संवेदनशीलता यातील समतोल पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नीरज पांडे दिग्दर्शित ‘घुसखोर पंडत’ या वेबसीरिजच्या शीर्षकावरून […]

अधिक वाचा..

मुंबईवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा चर्चेत अण्णामलाई; निवडणूक जबाबदाऱ्या सोडल्याने भाजपमध्ये खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले भाजप नेते के. अण्णामलाई पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना अण्णामलाई यांनी निवडणूक प्रचाराशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या सोडल्याची घोषणा केल्याने राज्य भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपकडून प्रचारासाठी तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. […]

अधिक वाचा..

लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाकेंना अखेर मोठा दणका

बीड: राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील आंदोलनानंतर सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला, या जीआरला ओबीसी समाजाकडून प्रचंड विरोध होत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको, स्वतंत्र्य आरक्षण द्या, अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे. त्यामुळे या जीआरनंतर पुन्हा एकदा ओबीसी समाज आणि मराठा समाज […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा बाप मीच! भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, शिंदे गट आक्रमक

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते परिणय फुके यांनी ‘शिवसेनेचा बाप मीच आहे, अस वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवलं आहे. भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटाने तातडीने आक्रमक भूमिका घेतली असून, माफीची मागणी केली आहे. फुके म्हणाले, शिवसेनेचा बाप मीच आहे, कारण सगळं खापर माझ्यावर फोडलं […]

अधिक वाचा..

महसूल विभागाचा दणका! वादग्रस्त पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात

मुंबई: बडतर्फ वादग्रस्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आता श्रीमती खेडकर हिला महसूल विभागाने दणका दिला आहे. या दणक्याने खेडकर हिची नियुक्तीच कायमची रद्द होऊ शकते. वादग्रस्त पूजा खेडकर हिला प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथे नियुक्ती देण्यात आली होती. या ठिकाणी त्या बीएमडब्ल्यू या महागड्या गाडीतून कार्यालयात […]

अधिक वाचा..

मी कोणतही वादग्रस्त विधान केल नाही, ‘स्वराज्यरक्षक’ या भूमीकेवर मी ठाम…

मुंबई: ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून माझ्या विरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आल्याचा घणाघात विधानसभेचे […]

अधिक वाचा..