पुणे : विवाहित मुलीचे महत्त्वाचे ओळखपत्र आणि कागदपत्रे आणण्यासाठी गेलेल्या सासऱ्यावर जावई आणि त्याच्या भावाने मिळून जीवघेणा हल्ला केला. जावयाने रागाच्या भरात थेट घरातील अल्युमिनियमचा जड ‘कूकर’ उचलून सासऱ्याच्या डोक्यात घातला. या भयंकर हल्ल्यात सासरे रक्तबंबाळ झाले असून, वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या दोन मुलींनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिंदे वासोली येथील टेट्रा कंपनीजवळ असलेल्या जांभळे यांच्या खोलीत घडला. तात्याराव बाबाराव तायडे (वय ४८, सध्या रा. खेड, पुणे; मूळ रा. वाशिन) यांची मुलगी प्रीती ही तिची लहान बहीण चैत्राली हिच्यासोबत पती रवी धर्माजी सावळे याच्या घरी आपले ओळखपत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे घेण्यासाठी गेली होती. मात्र, तिथे जाताच जावई रवी याने “तू इथून कुठेही जायचे नाही आणि काहीही न्यायचे नाही,” असे म्हणत त्याने प्रीतीला घरातच अडवून धरले.
View this post on Instagram
पती अडवून ठेवत असल्याचे पाहताच प्रीतीने तात्काळ फोन करून आपले वडील तात्याराव यांना मदतीसाठी बोलावून घेतले. तात्याराव तिथे पोहोचताच जावई रवी आणि त्याचा भाऊ अतुल सावळे या दोघांनी तात्यारावांना धमकावण्यास सुरुवात केली. “तुम्ही माझ्या पत्नीला इथून कसे नेता, तेच मी आता बघतो,” असे ओरडत त्या दोघांनी तात्याराव आणि त्यांच्या दोन्ही मुलींना मारहाण करण्यास सुरुवात केली.
तात्याराव जेव्हा मुलींना वाचवण्यासाठी गेले, तेव्हा जावई रवीने घरातील स्वयंपाकाचा कूकर हातात घेतला आणि थेट तात्याराव यांच्या डोक्यावर मारत राहिला. या हल्ल्यात तात्याराव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तितक्यावरच न थांबता रवीचा भाऊ अतुल याने तात्याराव यांच्यासह त्यांच्या लहान मुलीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. या हल्ल्यानंतर जखमी तात्याराव तायडे यांनी तात्काळ महाळुंगे पोलीस चौकी गाठली आणि आपल्या जावयाविरुद्ध रीतसर तक्रार दिली. महाळुंगे पोलिसांनी या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत आरोपी जावई रवी धर्माजी सावळे (वय ३८) आणि त्याचा भाऊ अतुल धर्माजी सावळे (वय ३०, दोघे रा. वासोली, खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिरूर तालुक्यात चोरी करताना तीन चोरट्यांना पकडले रंगेहात अन्…
शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; दातच पाडले…
शिरुर तालुक्यात HDFC बँकेत बनावट सोन्याचा लाखोंचा गोल्ड लोन घोटाळा; बारा जणांविरोधात गुन्हा दाखल
शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भरदिवसा मंगळसूत्र हिसकावले…
शिरूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दुचाकी चोरीचे वाढले प्रमाण…