कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरणाऱ्या 329 ग्राहकांवर गुन्हे दाखल

बारामती: महावितरणच्या लेखी वीज कनेक्शन कायम स्वरुपी बंद असणाऱ्या ग्राहकांची मागील काही दिवसांत फेर तपासणी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या बंद कनेक्शनच्या ठिकाणी आकडा टाकून वीजचोरी करणे किंवा शेजारील ग्राहकांकडून बेकायदा वीज वापरणे यासारखे प्रकार आढळले असून, 329 ठिकाणी महावितरणकडून पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वारंवार पाठपुरावा करुनही एखाद्या ग्राहकाने वीजबिल […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन 2 महिलांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात काही महिला वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र […]

अधिक वाचा..

संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरण तात्काळ आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावे

मुंबई: संजय राठोड यांच्या कार्यालयात एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल तर हे प्रकरण तात्काळ आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राज्याचे केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केला असून त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना […]

अधिक वाचा..

सकल हिंदू जनगर्जना मोर्चानंतर पोलिसांनी केले गुन्हे दाखल…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर शहरात काढण्यात आलेला मोर्चा संपल्यावर परतताना काही तरुणांनी रस्त्यावर असलेले औरंगाबाद नावाचे होर्डिंग फाडले. तसेच महानगरपालिकेच्या सिटी बसवर दगड मारून काचाही फोडण्यात आल्या आहेत. तसेच एका शौचालयावर असलेल्या बोर्डची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील मोर्चा […]

अधिक वाचा..

सणसवाडी व वढू बुद्रुक मध्ये वीज चोरांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) सह वढू बुद्रुक येथे वीजबिल थकबाकी असल्याने विद्युत वितरण विभागाकडून वीज पुरवठा खंडित केलेला असताना देखील चोरुन वीज वापरणाऱ्यांना कारवाई करत विद्युत केबल जप्त करुन दत्तात्रय रामभाऊ ढमढेरे व पंडित केशव वाजे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) सह वढू बुद्रुक येथे खंडित वीज पुरवठ्याबाबत […]

अधिक वाचा..