चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आला. कालव्याच्या सुरुवातीच्या म्हणजेच ‘हेड’कडील भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असतानाही प्रशासनाने शेवटच्या टोकाकडून म्हणजेच ‘टेल’कडून अस्तरीकरणाचे काम सुरू केल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी सोमवार (दि २७) सकाळी सुमारे अकरा वाजता सुरु असलेले काम बंद पाडले. […]

अधिक वाचा..

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मदत द्या; शेतकरी आंदोलन दडपल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: Harshvardhan Sapkal यांनी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवल्याचा आरोप करत राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानाकडे निघालेल्या मोर्चाला रोखण्यात आल्याने सरकार लोकशाही दडपत असल्याचा आरोप त्यांनी केला. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा मोर्चा काढण्याचे नियोजन होते. यावेळी Raju Shetti, Mahadev Jankar, Vinayak […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपतीत किसान जागृती यात्रेत सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कन्याकुमारी ते काश्मीर हि देशव्यापी किसान जागृती यात्रा सोमवार दि १६ फेब्रुवारी २०२६ रांजणगावात दाखल होताच हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन त्याचे जोरदार स्वागत केले. ढोल-ताशा, घोषणाबाजी आणि भगव्या-हिरव्या पताकांनी परिसर भरुन गेला होता. या यात्रेचे नेतृत्व वरिष्ठ शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल करत असून ७ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान देशभर शेतकरी […]

अधिक वाचा..