तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

आरोग्य

रोज करायचे काय

दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार नाही. जीभ साफ करणे फार गरजेचे असते. रोज जीभ साफ केल्याने तोंडाला वास येत नाही. जेवणानंतर माऊथवॉशचाही वापर करत जा. त्यामुळे तोंड स्वच्छ राहण्यात मदत होते. फ्लॉसर वापरणेही गरजेचे आहे. कॅव्हिटीची चिंता राहणार नाही. ब्रश साफ करू शकत नाही, ते फ्लॉसर करतो.दात घासण्यासाठी दोन मिनिटे पुरेशी असतात. दात गोलाकार पद्धतीत घासायचे असतात. आपण चुकीच्या पद्धतीने घासतो. फक्त पुढचेच नाही तर, मागील दात घासणेही गरजेचे असते. तीन महिन्यातून एकदा चेकअप करुन घ्या.

दाताला कीड का लागते

चहा प्यायल्यावर किंवा काहीही खाल्यावर दातावर थर तयार होतो. कार्बोडायड्रेट ग्लुकोज तयार करतात, ते दातात अडकतात. नीट साफ केले नाही तर, दाताला डाग लागतात. नीट चुळ न भरल्याने त्या लहान डागाचे रुपांतर कॅव्हिटीमध्ये होते. रात्री दात घासणे गरजेचे असते. काहीही खाल्यावर चुळ भरणेही गरजेचे असते. ते न केल्याने दात किडतात. किड दाताच्या तळाशी गेली की, दात दुखायला लागतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणं महत्त्वाचं.

दातांसाठी अलायनर्स चांगले की ब्रेसेस

प्रत्येकाच्या दातांच्या समस्येनुसार ते ठरते. असेच सांगता येणार नाही. पण ब्रेसेसपेक्षा अलायलर्सना ट्रिटमेंटमध्ये कमी वेळ लागतो. दिसायलाही अलायनर्स चांगल्या दिसतात. त्यामुळे अनेक जण ब्रेसेस न वापरता अलायनर्स वापरतात. लहान मुलांसाठी मात्र ब्रेसेस जास्त योग्य ठरतील. कारण ते ट्रिटमेंट घ्यायला टाळाटाळ करतात. पण ब्रेसेसची प्रोसेस आता फार चालत नाही. अलायनर्सच जास्त वापरले जातात.

फ्लॉसर म्हणजे काय

फ्लॉसरच्या मदतीने दातांच्या मधे अडकलेले अन्न काढता येते. साध्या फ्लॉसरला समोर हॅन्डल आणि दोरा असतो. त्याच्या मदतीने दात साफ करायचे. पण नवीन वॉटर फ्लॉसर पद्धत आली आहे. जास्त सोपी आणि गुणकारी आहे. पाण्याचा स्प्रे दातांवर मारुन अडकलेली घाण काढता येते. दिवसातून चार वेळा वापरला तरी हरकत नाही.

जीभ कशी साफ करावी

आपण जि‍भेचा समोरचा भाग साफ करून सोडून देतो. तसे न करता, जीभ मागपर्यंत साफ करा. तोंडातून वास येणार नाही. जीभ साफ करायला अर्धा मिनिट पुरेसा आहे. ब्रशने कधीच जीभ साफ करू नका. टंगक्लिनर विकत घ्या आणि वापरा. मऊ असलेले टंगक्लिनरच वापरावे.

टिथ व्हाइटनिंग किट वापरावे का

दात पांढरे दिसावेत म्हणून व्हाइटनिंग पेस्ट वगैरे वापरण्याचा शक्यतो डॉक्टर सल्ला देत नाहीत. दात पांढरे व्हावे म्हणून त्यात वापरले जाणारे पदार्थ हानिकारक ठरू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरायचा की नाही ते ठरवा. जर दात पांढरे करायचेच आहेत तर, ब्लिचिंग करून घ्या. स्वत:हूनच काही प्रयोग करू नका.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत