जनतेच्या दारी शासन! ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाची मुंबईत प्रभावी अंमलबजावणी

मुंबई: जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियानाच्या (टप्पा-१) मुख्य उद्देश असून, या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या. या अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक नियोजन भवन येथे पार पडली. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे […]

अधिक वाचा..

नागपूर स्फोटप्रकरणी सरकारवर हल्लाबोल; ‘हे हत्याकांडच’;  विजय वडेट्टीवार

मुंबई: नागपूर येथील SBL कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात २२ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून विधानसभेत जोरदार खळबळ उडाली. हा प्रकार केवळ हलगर्जीपणा नसून प्रशासकीय यंत्रणा आणि कंपनी मालकांच्या संगनमताने केलेले ‘हत्याकांड’ असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करताना वडेट्टीवार यांनी एफआयआरमधील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. […]

अधिक वाचा..

आंदोलन थांबवा; इ-चलानांवर सरकारचा सकारात्मक सूर; प्रताप सरनाईक

मुंबई: अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील वाहतूकदारांना ५ तारखेपासूनचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. राज्यातील विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, “इ-चलनांच्या कारवाईबाबत वाहतूकदारांच्या भावना […]

अधिक वाचा..

सरकारी दप्तर थेट गावात! शिरूरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’चा धडाका

शिरूर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन, दाखले व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न थेट गावपातळीवर सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” टप्पा क्र. १ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दि. ०१ मार्च रोजी विदयाधाम प्रशाला, शिरूर येथे पूर्वतयारी बैठक पार पडली. बैठकीचे […]

अधिक वाचा..

भाजपा महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, जेवल्याशिवाय खरे नाही’, फडणवीस […]

अधिक वाचा..

पुण्यातील गाजलेली हत्या! माजी नगरसेवक वनराज आंदेकर प्रकरणात ३ प्रमुख कारणांचा सरकारी वकिलांचा दावा

पुणे: वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येमागे तीन ठोस कारणे असल्याचा दावा सरकारी वकिलांनी विशेष न्यायालयात युक्तिवाद करताना केला आहे. या खळबळजनक प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने तब्बल १७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले असून २१ आरोपींविरोधात कारवाई सुरू आहे. आतापर्यंत ३९ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली असून उर्वरित प्रक्रिया पुढील सुनावणीत पूर्ण […]

अधिक वाचा..

सरकारचा निवडणुकीपूर्वी ‘दिवसा वीज’ चा डंका अन निकालानंतर शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा काळोख

न्हावरे (तेजस फडके): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत सरकारच्या वतीने “शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज” देण्याची ग्वाही देत गावोगावी घोषणा झडल्या. राजकीय व्यासपीठांवरुन मोठमोठी आश्वासने देत मतांची मागणी करण्यात झाली. मात्र निकाल जाहीर होताच त्या आश्वासनांचा फुगा फुटला आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा काळोखच आला. सध्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी […]

अधिक वाचा..

केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून निधी द्यावा: विजय वडेट्टीवार

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (रोहयो) वाटोळे झाले आहे. थकीत निधीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३ लाख १२ हजार कामे बंद पडली असून मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही,असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केला. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात मजुरांची संख्या […]

अधिक वाचा..

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याबाबत सरकारला ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रस्ता उभारण्यात आलेल्या ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा होऊनही तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा मुद्दा विधानपरिषद सदस्य हेमंत पाटील यांनी लक्षवेधी द्वारे विधान परिषदेत उपस्थित केला होता.“हा पुतळा नेमक्या किती दिवसांत उभारला जाणार?” असा प्रश्न त्यांनी सरकारकडे केला.यावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना […]

अधिक वाचा..

शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारकडून पोलीस बळाचा वापर, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्ती लाटण्याचा घाट

मुंबई: गेल्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची स्थिती मांडली. विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानीचा पाढा वाचताना वडेट्टीवार म्हणाले की नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर ,नांदेड ,परभणी भागात वादळी […]

अधिक वाचा..