उन्हाळी सुट्ट्यांवर जनगणनेचं सावट; शिक्षकांना सुट्टीऐवजी सरकारी कामाची जबाबदारी

मुंबई: राज्यात २ मे ते १४ जूनदरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागण्याची शक्यता असताना, यंदा शिक्षकांना मात्र या सुट्ट्यांचा लाभ घेता येणार नाही. सरकारने आगामी जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात शिक्षकांना जनगणनेची कामे करावी लागणार असून, या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व अनुदानित व […]

अधिक वाचा..

निधी वाटपात पक्षपातीपणा; आदिवासी निधी वळवण्यावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला

मुंबई: राज्यातील महायुती सरकार निधी वाटपात पक्षपातीपणा करत असून अर्थसंकल्पातील निधी केवळ सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातच दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. “सबका साथ, सबका विकास” ही घोषणा फक्त घोषणेतच राहिली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात, सरकार फक्त लाडक्या कंत्राटदारांचे हित जपण्यात व्यस्त

मुंबई: महायुती सरकारने अर्थसंकल्प मध्ये जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक असून, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी शेती, सिंचन आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारवर कडक ताशेरे ओढले. शेतकरी प्रश्नांवर बोलताना वडेट्टीवार यांनी कर्जमाफीच्या निकषांवर […]

अधिक वाचा..

मुंबईतील विधानभवन, उच्च न्यायालय, बीएसई व मेट्रोला बॉम्बची धमकी; सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: मुंबईतील विधानभवन, मुंबई उच्च न्यायालय, बीएसई आणि मेट्रोला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी येणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. औचित्याच्या […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्पीय चर्चेत वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला

महसूल, शिक्षण, वन व वैद्यकीय शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश मुंबई: विधानसभेत अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेदरम्यान काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी महसूल, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील अनागोंदी कारभार, वाढता भ्रष्टाचार आणि प्रलंबित जनहिताच्या प्रश्नांवरून सरकारला जोरदार धारेवर धरले. विविध विभागांतील गैरव्यवहार आणि प्रशासनातील ढिसाळपणाची त्यांनी सभागृहात सविस्तर पोलखोल केली. महसूल विभागावर बोलताना राज्यातील […]

अधिक वाचा..

राज्यात गॅस टंचाईमुळे चूल विझण्याची वेळ सरकारने जनतेची दिशाभूल थांबवून वस्तुस्थिती स्पष्ट करावी; विजय वडेट्टीवार 

मुंबई: राज्यात सध्या घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्य गृहिणींमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. एकीकडे सरकार विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जनतेला आपली चूल कशी पेटवायची, याची चिंता सतावत आहे. सरकारने या गंभीर परिस्थितीवर तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आज काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विधानसभेत करण्यात आली. राज्यातील सद्यस्थिती […]

अधिक वाचा..

गृहस्वामिनी गॅसवर! महिलादिन तर रोजचाच… अशी महागाई नको सरकार!

मुंबई: देशाचा असो की राज्याचा अर्थसंकल्प, कुटुंबाचे बजेट सांभाळणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ अर्थात गृहस्वामिनीचे लक्ष सर्वप्रथम कशाकडे असते? कांदा, बटाटा, भाजीपाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरगुती गॅसच्या किमतीकडे. आजही प्रत्येक घरात महागाईचा भडका किती वाढणार याचीच चर्चा आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याच्या दरातील चढ-उतारावरही सर्वसामान्यांचे लक्ष आहे. प्रश्न अनेक आहेत… पण उत्तर एकच दिले जाते […]

अधिक वाचा..
sanjeev-palande-pabal

शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे शिबीरातून होणार निराकरण : संजीव पलांडे

शिरूर : ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन नोंदी, विविध दाखले तसेच शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न गावपातळीवरच सोडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा पहिला टप्पा पुणे जिल्ह्यात सुरू करण्यात आला असून मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांच्या तक्रारी आणि प्रलंबित […]

अधिक वाचा..

हा महाराष्ट्राचा नव्हे, MMRDA चा अर्थसंकल्प;  विजय वडेट्टीवर यांची सरकारवर उपरोधिक टीका

मुंबई: विधानसभेत सादर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा मारा असून त्यातून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली आहे, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य २०४७ मध्ये होईल, असा टोला लगावत त्यांनी सरकारवर उपरोधिक निशाणा साधला. अर्थसंकल्पातील त्रुटींवर बोट ठेवताना वडेट्टीवार […]

अधिक वाचा..

कामगार साहित्य वाटपातील गोंधळावर सरकारला धारेवर; विजय वडेट्टीवार यांचा मुदतवाढीवर सवाल

मुंबई: अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य वाटप करताना झालेल्या गोंधळावरून आज विधानसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरत कामगार विभागातील गैरव्यवहार आणि एका अधिकाऱ्याला मिळालेल्या नियमबाह्य मुदतवाढीचा मुद्दा उपस्थित केला. वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक […]

अधिक वाचा..