‘स्वच्छता मॉनिटर्स’नी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले; दीपक केसरकर

मुंबई: ‘लेट्स चेंज’ प्रकल्पांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य देशालाही दिशा दाखवेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्वाचा विकासदेखील आवश्यक असतो, या उपक्रमाच्या माध्यमातून तो साध्य होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभारच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकास दुचाकी

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथे प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकास दुचाकी भेट देण्यात आली आहे. हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीतील शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 22 विद्यार्थी पात्र […]

अधिक वाचा..

पाबळ मध्ये भारत स्काऊट गाईड रहिवासी शिबिर

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारत स्काऊट गाईडच्या 2 दिवसीय रहिवासी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असताना सलग चौथ्या वर्षी सदर शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारत स्काऊट गाईडच्या 2 दिवसीय रहिवासी शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस […]

अधिक वाचा..