हिवरे कुंभारच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकास दुचाकी

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथे प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकास दुचाकी भेट देण्यात आली आहे.

हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीतील शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 22 विद्यार्थी पात्र ठरले 9 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवंत यादीत स्थान मिळवत शाळेची गुणवत्ता कायम राखली आहे, तर प्रजासत्ताक दिनी शाळेमध्ये आयोजित कार्यक्रम दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत माजी सैनिक दादाभाऊ जाधव, बबन शिर्के, सत्यवान जगताप, संतोष गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सरपंच शारदा गायकवाड, उपसरपंच दिपक खैरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमोल जगताप, सामुदायिक विवाह सोहळ्याचे जनक विकास गायकवाड, सोसायटीचे चेअरमन रेवणनाथ जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष माणिक जगताप, मुख्याध्यापक शुकराज पंचरास यांसह आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान चिन्ह देत सन्मान करण्यात आला असून यावेळी शिष्यवृत्ती मार्गदर्शक सुनिल फंड व अंजली शिंदे यांचा विशेष सन्मानचिन्ह देत सन्मान करण्यात आला असून यावेळी सुनील फंड यांचा विद्यार्थी पालक, ग्रामस्थ तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या वतीने दुचाकी भेट देऊन आगळावेगळा सन्मान करण्यात आला आहे, दरम्यान पालक व ग्रामस्थांकडून झालेल्या सन्मानाने मार्गदर्शक शिक्षक सुनील फंड हे भरून गेले होते.