गडचिरोलीतील पाच रुग्णवाहिका दोन वर्षांपासून बंद; गैरव्यवहाराची चौकशी करा; विजय वडेट्टीवार

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित गंभीर बाब औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत उपस्थित करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णवाहिकांच्या गैरव्यवहाराची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. गडचिरोली जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अखत्यारीतील पाच रुग्णवाहिका सर्व्हिसिंगसाठी चंद्रपूर येथील शोरूममध्ये देण्यात आल्या होत्या. यापैकी दोन रुग्णवाहिका सहा महिन्यांपूर्वी, तर तीन रुग्णवाहिका तब्बल […]

अधिक वाचा..

कुणबी दाखल्यांची चौकशी करा; पंकजा मुंडें

मुंबई: मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत यासाठी हैदराबाद गॅझेटवर आधारित जीआर काढला खरा मात्र यामुळे सरकारची डोकेदुखी वाढू लागलीय.या जीआरविरोधात छगन भुजबळ यांच्यानंतर आता पर्यावरणमंत्री आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडेही मैदानात उतल्या आहेत. ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीत नवे मुद्दे समोर आले आहेत. आतापर्यंत दिलेल्या कुणबी दाखल्यांची चौकशी करण्याची मागणी पंकजा मुंडेंनी केलीय. एवढंच नव्हे तर […]

अधिक वाचा..

महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करा

ठाणे: कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांचा होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्थानिक समिती कार्यरत असते. शासन निर्णय क्र.मकची-२०१४/ प्र.क्र.६३/ मकक दि.११ सप्टेंबर, २०१४ अन्वये जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करण्यासाठी अध्यक्ष व सदस्य पदासाठी खालीलप्रमाणे अनुभव असलेल्या व्यक्तींकडून […]

अधिक वाचा..

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना

मुंबई: नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत केली. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू झाली […]

अधिक वाचा..

विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा

मुंबई: लोकसभा निवडणुकीत घवघवीत विजय मिळवलेल्या महाविकास आघाडीचा पाच महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव होतो हे अनाकलनीय आहे. रात्रीच्या अंधारात मतांवर दरोडा टाकून भाजपा युती निवडणूक आयोगाच्या मदतीने विजयी झाली आहे. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग पुराव्यासह खुलासा का करत नाही, असा संतप्त सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विचारला […]

अधिक वाचा..

MHT-CET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा, पेपरमधील चुकांचे गुण विद्यार्थ्यांना द्या

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्य सामाईक परिक्षा (MHT-CET) सेल यांच्या माध्यमातून रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी परीक्षा घेतली. पण या परिक्षेतील घोळामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रावर ५० गुणांच्या गणिताच्या पेपरमध्ये २० ते २५ प्रश्नांसाठी उत्तराचे पर्याय चुकीचे होते अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. हा […]

अधिक वाचा..

शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणार

मुंबई: शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभेत सांगितले. या लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी अधिक माहिती देताना मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या […]

अधिक वाचा..

पोलीस यंत्रणांनी महिलांच्या गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा

कोल्हापूर: कोल्हापूर दौऱ्यांतर्गत, कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्ह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही व उपाययोजना संदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज (सोमवार, ६ जानेवारी २०२५) बैठकीचे आयोजन केले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मागील वर्षभरात महिला अत्याचार विषयक घटनांमध्ये दाखल गुन्हे व त्यामध्ये झालेल्या कार्यवाहीतील प्रगती, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यासंदर्भात […]

अधिक वाचा..

उल्हासनगरातील भूमाफियांची चौकशी क्राईम ब्रांचकडे

खंडणीचा खोटा गुन्हा बुमरॅंग होणार मुंबई: उल्हासनगरातील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीची व हितसंबंधितांविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता घोटाळेबाजांवरच बुमरॅंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील महिन्यांत २८ तारखेला हिललाईन पोलिस स्थानकात १ कोटी रुपयांची खंडणी मागत ५ लाख खंडणी घेतल्याबाबतचा खोटा गुन्हा कोणतेही पुरावे नसतांनाही […]

अधिक वाचा..

अदानी उद्योगातील २० हजार कोटी रुपयांची चौकशी करण्याची हिम्मत मोदींनी दाखवावी

मुंबई: मोदी सरकारने मागील ९ वर्षात मित्रोंसाठी काम करत जनतेचा पैसा त्यांच्या खिशात घालण्याची व्यवस्था केली आहे. देशातील सर्व सरकारी उद्योग, कंत्राटे फक्त अदानींनाच बहाल केली आहेत. अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? हाच प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. हे २० हजार कोटी […]

अधिक वाचा..