शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर ग्रामीण, बाबुरावनगर तसेच रामलिंग या भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्यकर्ते जोरदार प्रचार करत असुन मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे.

डॉ अमोल कोल्हे हे उच्चशिक्षित असुन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी सातत्याने संसदेत आवाज उठवला आहे. सध्या वाढती महागाई, शेतकरी तसेच बेरोजगार युवक यांच्या अनेक समस्या आहेत. केंद्रात सध्या असलेले सरकार सर्व सामान्य जनतेसाठी हिताचे नाही. त्यामुळे या सरकारला सर्वसामान्य जनता कंटाळली असुन खासदार म्हणुन डॉ कोल्हे संसदेत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न पोट तिडकीने मांडत असल्यामुळे त्यांना निवडुन देण्याचे आवाहन प्रचारादरम्यान कार्यकर्ते मतदारांना करत आहेत.

 

रामलिंग येथील शिक्षक कॉलनी, ओमरुद्रा कॉलनी, जाधव मळा, शिवरक्षा कॉलनी, ओयासीस कॉलनी, औदुंबर सोसायटी, धनगरवाडा, चिचणी मळा या ठिकाणी दोन दिवसात सर्व कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन डॉ कोल्हे यांचे चिन्ह तसेच त्यांची कामे मतदारांना भेटीगाठी घेऊन समजाऊन सांगत आहेत. तसेच सर्वसामान्य लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असुन केंद्र सरकारच्या आश्वासनाला लोक कंटाळले असल्याचे सर्वसामान्य मतदार सांगत आहेत.

 

शिरुर ग्रामीणमध्ये डॉ कोल्हे यांचा प्रचार करण्यासाठी राणी कर्डिले, संगिता शेवाळे, डॉ स्मिता कवाद, गीता आढाव, राणी शिंदे, अनिता गवारे, ज्योती जगताप, छाया हारदे, निर्मला ढोकले, वर्षा जगधणे, नलिनी भोसले, छाया पाडळे, शामकांत वर्पे, तुषार दसगुडे, शरद पवार, केशव शिंदे, यशवंत कर्डिले, रामदास जामदार, प्रशांत साबळे, अक्षय जाधव, प्रथमेश चाळके संकेत सुरवसे, संतोष बोऱ्हाडे आदी कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत.

Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत