crime

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

क्राईम मुख्य बातम्या

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली असुन या प्रकरणी शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निमगाव म्हाळुंगी येथील नवनाथ शिवाजी भोरडे याने शिक्रापुर पोलिस स्टेशनला एक फिर्याद दिली होती. हि दिलेली फिर्याद मिटवून घेऊ म्हणून नवनाथ भोरडे याचा मोठा भाऊ सुरेश भोरडे यांने संतोष सुभाष चौधरी यास फोन करुन घरी बोलावून घेतले. भोरडे कुटुंबातील सर्वांनी त्यांना शिवीगाळ दमदाटी करुन धमकी देत बेदम मारहाण केली. यासर्व प्रकारामुळे संतोष चौधरी व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य घाबरुन गेले.

 

तसेच भोरडे कुटुंबाच्या सततच्या धमकीमुळे दहशतीखाली असलेल्या संतोष यांनी विषारी औषध प्राशन केले. हि बाब चौधरी कुटुंबातील सदस्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संतोष चौधरी यांना पुणे येथील ससुन सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान संतोष चौधरी यांचा मृत्यू झाला.

 

या घटनेबाबत संतोष चौधरी यांचे भाऊ सचिन सुभाष चौधरी यांनी संतोष यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन १) नवनाथ शिवाजी भोरडे, २) सुरेश शिवाजी भोरडे, ३) बाळू शिवाजी भोरडे, ४ )कोयना नवनाथ भोरडे ५) सुरेश भोरडे याची पत्नी ६) बाळू शिवाजी भोरडे याची पत्नी या सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सतिश पवार, पोलिस हवालदार किशोर तेलंग, पोलिस नाईक अमोल नलगे हे करत असताना असुन या गुन्ह्यात अजुन तीन आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात नऊ आरोपींचा सहभाग असुन तसेच हे सर्व आरोपी (निमगाव म्हाळुंगी ता.शिरुर जि.पुणे) येथील आहेत.

 

तसेच शिक्रापुर पोलिस स्टेशनचे अधिकारी संबंधित गुन्ह्यातील आरोपींना कधी अटक करणार याबाबत ग्रामस्थांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. संतोष चौधरी यांच्या मृत्यूनंतर पोलिस आरोपींना अटक करुन त्यांना नक्कीच न्याय मिळवुन देतील असे नागरीकांना वाटत आहे.

(क्रमशः) 

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत