शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

महाराष्ट्र मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना राबविल्या हे भाजपासहीत महायुतीचे मित्रपक्ष सांगत आहेत. परंतु शिरुर तालुक्यातील गुनाट गावातील भाऊसाहेब मच्छिंद्र भगत यांच्या पेरणी यंत्राचे शासकीय अनुदान 353 दिवस म्हणजे जवळपास 12 महिने उलटुन गेले तरी अद्यापपर्यंत जमा न झाल्याने सरकारकडे शेतकऱ्याला देण्यासाठी 24 हजार रुपये नसावेत हि लाजिरवाणी गोष्ट असल्याचे मत भाऊसाहेब भगत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत गुनाट (ता. शिरुर) येथील भाऊसाहेब मच्छिंद्र भगत यांनी पेरणी यंत्रासाठी निवड झाली होती. पुर्व संमत्ती दिल्यानंतर यंत्र घेण्यात आले, तपासणीही झाली तसेच अनुदानाची शिफारसही झाली. परंतु 353 दिवस म्हणजे जवळपास 12 महिने उलटुन गेले. तरीही ‘तारीख पे तारीख’ या सरकारी नियमाप्रमाणे अद्यापपर्यंत अनुदान जमा न झाल्याने सरकारकडे 24 हजार रुपये शेतकऱ्यास देण्यासाठी नसावेत हि गंभीर बाब आहे.

 

जेजुरी येथील शासन आपल्या दारी उपक्रमात भाऊसाहेब भगत हे आवर्जुन उपस्थित राहीले. तिथ तरी अनुदानाचे चेक मिळतील अशी अपेक्षाही त्यांना होती. पण तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे हा शेतकरी मेटाकुटीस आला असुन अनुदानित औजारे घेताना भरमसाठ जीएसटी (GST) भरावी लागतो आणि त्यात वर्षभर जर अनुदान आले नाही तर त्या अनुदानाचा लाभ न मिळाल्यासारखाच आहे असेही भगत म्हणाले.

 

शासनाने चालु केलेली महाडीबीटी योजना शेतकऱ्यांच्या हिताची ठरताना दिसत नाही. कारण ज्यांना जे औजार घ्यायची आहे. त्यांचे नंबर वेळेला लागत नाहीत आणि ज्यांना घ्यायचे नाही अशा शेतकऱ्यांचे नंबर लागतात. औजारांच्या बाबत जो प्रकार घडतोय तोच कांदाचाळ आणि शेततळ्याबाबत घडत आहे. कांदा काढणीच्या अगोदर म्हणजे सर्वसाधारण फेब्रुवारी ते मार्च महिन्यात कांदाचाळी उभारल्या जातात. पण त्यावेळी लकी ड्रॉ होईलच असे नाही आणि झाला तरी नंबर लागेलच असे नाही.

 

तसेच शेततळ्याबाबतही तीच गोष्ट आहे मार्च ते मे दरम्यान पावसाळा नसल्याने शेतकरी शेततळे करण्यासाठी इच्छुक असतात. परंतु त्यावेळी नबंर लागतीलच असे होत नाही. एकंदरीत महाडीबीटी योजना हि फक्त दिखावुपणा आहे असे मत अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. ज्याला जे लागत ते द्यावं आणि तपासणी करुन घ्यावी हिच जुनी पध्दत चालू व्हावी असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत