नाथषष्ठीत ‘नाथांचा रांजण’ भरला; पैठणमध्ये भक्तीचा जल्लोष

पैठण: नाथषष्ठी उत्सवानिमित्त पैठण येथे पारंपरिक ‘नाथांचा रांजण भरणे’ हा धार्मिक सोहळा शनिवारी मोठ्या भक्तिभावात पार पडला. भाविकांनी गोदावरी नदीतून पवित्र जल आणून संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील पवित्र रांजण भरत शतकानुशतके चालत आलेली परंपरा यंदाही जपली. परंपरेनुसार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ‘श्रीखंड्या’ या रूपात तब्बल १२ वर्षे संत एकनाथ महाराजांच्या सेवेत राहून गोदावरीचे पाणी आणून रांजण […]

अधिक वाचा..

पोलिसांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे हरवलेला मोबाईल सापडल्याने त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच…

ट्रॅफिक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांचे स्तुत्य कार्य शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बी.जे. कॉर्नर परिसरात वाहतूक नियमन करत असताना ट्रॅफिक पोलिसांनी दाखवलेली सजगता व प्रामाणिकपणा याचे कौतुक होत आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल फोन योग्य तपासणी करून तो प्रत्यक्ष मालकाच्या हाती परत करताना मानवतेचे उत्तम उदाहरण घालून दिले. […]

अधिक वाचा..

अन् दिव्यांग ‘संदेश’च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले…

मुंबई: मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कनवाळू स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा सर्वांना आला. भेटीसाठी आलेल्या बांधकाम मजुर असलेल्या आणि अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या जव्हारच्या संदेश पिठोलेला मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीचा पाच लाखांचा धनादेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या […]

अधिक वाचा..