leopard

शिरुर तालुक्यात “या” गावात बिबट्यांचा मुक्त संचार, शालेय विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बिबट्यांची संख्या आणि दिवसाढवळ्या होणारा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना वनविभागाकडून मात्र तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. जांबूत आणि पिंपरखेड परिसरात मागील दोन वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे चार जणांचा बळी गेला आहे. नागरिकांवर झालेले हल्ले आणि धोक्यात आलेले पशुधन यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झालेली दिसून येत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्याच्या बेट भागात तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): गेली दीड वर्षांपासून शिरूर तालुक्याच्या बेट भागातील जांबूत, पिंपरखेड, शरदवाडी, वडनेर खुर्द, चांडोह आदी भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मागील वर्षांत या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 4 जणांना आपला जीव गमवावा लागला असून मोठ्या प्रमाणात पशुधनही धोक्यात आले असल्याचे चित्र दिसून येत आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे मागील आठ दिवसांपासून दाभाडेमळा, बोऱ्हाडेवस्ती, दातेवस्ती […]

अधिक वाचा..

बिबटयाच्या दहशतीमुळे विजेची वेळ पूर्ववत करण्याची शेतकऱ्यांची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुरच्या बेट भागातील, काठापूर खुर्द, पिंपरखेड, चांडोह, सविंदणे, जांबुत, टाकळी हाजी, आमदाबाद, मलठण या गावांमध्ये बिबट्याने थैमान घातल्याने चार जणांचे बळी गेले, तर कित्येकजण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांना पशुधन गमवावे लागले आहे अशा परिस्थितीती शेतकऱ्यांना दिवसादेखील शेतात काम करताना बिबट्याचे दर्शन होत असल्याने दिवसा वीज मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बिबटयाचे पशुधनावर हल्ले सुरुच

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील पश्चिमेकडील कामठेवाडीमध्ये शेतकरी रविंद्र पुंडे यांच्या शेतीमध्ये मेंढपाळ सुभाष कोकरे रा. ढवळपुरी यांचा वाडा बसला असता रात्री १ ते २ दरम्यान वाड्यावरील बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे. मेंढपाळ कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने जागे झाले व त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथुन एका बकराचा फडशा पाडुन पलायन केले. या परीसरातील ग्रामस्थांमध्ये […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर, हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ…

शिरुर: पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमध्ये यापूर्वी बिबट्याचा वावर प्रामुख्याने दिसून येत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत शिरुर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. जनावरे आणि माणसांवरील हल्लेही वाढत असल्याचे दिसून येत असून, याच आठवड्यात हल्ल्याच्या तीन-चार घटना घडल्या आहेत. पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरुर तालुक्यातील चित्र सिंचनामुळे बदलले असून उसाची […]

अधिक वाचा..